LPG Cylinder Price : आज ऑगस्ट महिन्याचा पहिलाच दिवस मोठी गुडन्यूज घेऊन आला आहे. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक शहरात एलपीजी गॅस सिलिंडरच्य दरात मोठी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात 100 रुपये कपात करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळालेला नाही. कारण, घरगुती गॅसचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.
क्रेन कोसळून समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
ऑगस्ट महिन्याची पहिल्या तारखेला देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजीच्या किंमती जाहीर केल्या आहेत. व्यावसायिक गॅसच्या किंमती 100 रुपयांनी कमी केल्या आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या दृष्टीनेही त्यांना या किंमत कपातीचा फायदा मिळणार आहे. याआधी जून महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 83 रुपयांची कपात करण्यात आली होती. मे महिन्यातही किंमतीत घट झाली होती. एप्रिलमध्य सिलिंडरची किंमत 2028 रुपये होती. मार्चमध्ये त्याची सर्वाधिक 2119.50 रुपये किंमत होती. जानेवारी आणि फेब्रुवारीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1769 रुपये होती. जुलै महिन्यात गॅस सिलिंडरचा दर सात रुपयांनी वाढला होता.
मागील काही दिवसांपासून व्यावसायिक गॅसच्या किंमती सातत्याने बदलत असताना घरगुती गॅसच्या किंमती मात्र आहे तशाच आहेत. यंदाही या किंमतीत कोणताच बदल केलेला नाही. याआधी 1 मार्च 2023 मध्ये घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मात्र दरात कोणताही बदल झालेला नाही.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहरात गॅस सिलिंडरचे दर 93 रुपयांनी कमी झाले आहेत. येथे व्यावसायिक सिलिंडर आता 1802.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 1640.50 रुपये, चेन्नईत 1852.50 रुपयांना सिलिंडर मिळेल.