क्रेन कोसळून समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

क्रेन कोसळून समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

मुंबई : मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघात चर्चेचे कारण ठरत आहेत. अशात समृद्धी महामार्गावर आणखी एक मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे महामार्गाचे काम चालू असताना ब्रीज गर्डरला जॉईन करणारी क्रेन खाली पडल्याने किमान 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये बहुतांश कामगारांचा समावेश आहे. क्रेन साधारण 100 फूट वरून खाली पडली. यात खाली काम करणाऱ्या कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यापूर्वीही बुलढाण्याजवळ काम सुरु असताना पुलाचा गर्डर कोसळला होता. (At least 12 people died on the spot when a crane fell while work was underway on the Samriddhi highway)

बातमी अपडेट होतं आहे…

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube