Download App

Cabinet Portfolio : मोठी बातमी! अर्थ, सहकारसह महत्वाची खाते दादांकडे, शिंदे गटाला झटका…

अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर खातेवाटपाच्या घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला खातेवाटपाचा तिढा सुटल्याची चिन्हे दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची आहेत, याबाबतची यादी राज्यापाल रमेश बैस यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. या यादीवर आता राज्यापालांची सही होणं बाकी आहे. (maharashtra cabinet expansion ajit pawar group to get important cabinet portfolio)

Nitesh Rane : राणेंनी दाखवला ‘तो’ जीआर; म्हणाले, आता पोहरादेवीची माफी कोण मागणार?

सुत्रांच्या माहितीनूसार अजित पवार गटाच्या 9 आमदारांना महत्वाची खाती देण्यात आली आहेत. अजित पवार गट सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर शिवसेनेची कोंडी झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पवार गटाला दिलेल्या खात्यांंमुळे शिंदेंच्या मंत्र्यांना धक्का बसणार असल्याचं बोललं जातं आहे.

‘तुमच्या फालतु कुटनितीमुळे लोक तुम्हाला कुटून खातील’; राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

सरकारमधील महत्वाचे मानले जाणारे अर्थ, सहकार, कृषी, महिला व बालकल्याण, मदत पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन ही खाते राष्ट्रवादीकडे गेली आहेत. तर अजित पवार यांच्याकडे अर्थ, धनंजय मुंडे – धनंजय मुंडे – कृषी, दिलीप वळसे पाटील – सहकार, हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण, छगन भुजबळ – अन्न नागरी पुरवठा, धर्मराव अत्राम – अन्न आणि औषध प्रशासन, अनिल भाईदास पाटील क्रीडा, आणि अदिती तटकरेंकडे महिला आणि बालकल्याण खाते देण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीला महत्वाची खाते दिल्याने सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात आहे. तीन पक्षातील कोण आमदार नाराज आहे, याबाबत अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नसून शिंदे गटाच्या आमदारांची अजित पवारांच्या एन्ट्रीने कोंंडी होत असल्याची चर्चा सुरु आहे.

खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन अनेक चर्चा सुरु होत्या. हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठका झाल्या होत्या. मात्र, या बैठका निष्फळ ठरल्याचं समोर आलं होतं. अजित पवार अर्थ सहकारसह इतर महत्वाच्या खात्यांवर ठाम होते.

अखेर हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीवारी केल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात बैठकीत चर्चा झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आता महाराष्ट्रात खातेवाटपाच्या चर्चांना वेग आलाय. अखेर आज राज्यापालांकडे खातेवाटपाची यादी पाठवण्यात आली आहेत.

Tags

follow us