वडिलांच्या निधनानंतर खासदार धानोरकरांची प्रकृती खालावली; एअर लिफ्टने दिल्लीला हलवले

Congress : काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले आहे. 27 मे रोजी धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी खासदार धानोरकर उपस्थित नव्हते. त्यांच्यावर मागील दोन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. धानोरकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू […]

Balu Dhanorkar

Balu Dhanorkar

Congress : काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले आहे. 27 मे रोजी धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी खासदार धानोरकर उपस्थित नव्हते. त्यांच्यावर मागील दोन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

धानोरकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आतड्यांतील इन्फेक्शनमुळे त्यांना त्रास जाणवत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आज मात्र त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना तातडीने दिल्ली येथे नेण्यात आले.

‘माझ्यासाठी दिल्ली अजून खूप दूर’; लोकसभेच्या उमेदवारीवर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले

सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे (Congress) खासदार आहेत. ते राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. या मतदारसंघात त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या निवडणुकीत फक्त एकच खासदार काँग्रेसचा निवडून आला. त्यामुळे त्यांच्या नावाची राज्यासह देशभरात चर्चा झाली होती.

धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर यांचे नुकतेच नागपूर येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. आज त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असल्याने खासदार धानोरकर यांना अंत्यसंस्कारासाठीही उपस्थित राहता आले नाही. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने दिल्लीला नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version