Download App

Maharashtra Congress : नाना पटोले जाणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची नवी चर्चा

  • Written By: Last Updated:

गेल्या काही महिन्यापासून राज्य काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) फेरबदल होणार असल्याच्या अनेक बातम्या अधून-मधून येत असतात. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नव्या बदलाचे संकेत मिळत आहेत. राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेता दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. लोकमतने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

काही महिन्यापूर्वी झालेल्या पदवीधर मतदारसंघात झालेल्या वादानंतर नाना पटोले यांच्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. याच वादातून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नाना पटोले यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी चर्चा रंगली होती. पण यामध्ये केंद्रीय नेतृत्वाकडून नाना पटोले यांचा राजीनामा घेतला गेला नाही. पण आता पुन्हा नव्याचे याची चर्चा रंगली आहे.

Ajit Pawar : कोणाच्या सोईने हा कार्यक्रम करण्यात आला, याची चौकशी करा अन्यथा…

नवीन प्रदेशाध्यक्ष कोण ?

नाना पटोले यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची नेमणूक केली गेली तर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली आहे. नितीन राऊत, सतेज पाटील, सुनील केदार, यशोमती ठाकूर व अशोक चव्हाण यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. आगामी कर्नाटक निवडणुकीनंतर हा बदल केला जाणार असल्याची चर्चा आहे.

काही महिन्यापूर्वी नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत, त्यामुळे कदाचित त्यांच्या नावावर फुली येऊ शकते. सतेज पाटील गेल्या काही वर्षांपासून ते पश्चिम महाराष्ट्राला काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून चर्चेत आहेत. त्यामुळे त्याच्या नावावरही विचार होऊ शकतो. पण काही दिवसापूर्वी त्यांना विधिमंडळात जबाबदारी दिली आहे.

…नाव घेतलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं, अजित पवारांचा राऊतांना टोला

अशोक चव्हाण याआधी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांनाही ही संधी मिळू शकते. याशिवाय सुनील केदार, यशोमती ठाकूर यांच्या नावाची देखील दिल्लीमध्ये चर्चा आहे. येत्या काळात हे चित्र स्पष्ट होईल.

Tags

follow us