Ajit Pawar : कोणाच्या सोईने हा कार्यक्रम करण्यात आला, याची चौकशी करा अन्यथा…
Ajit Pawar On Maharashtra Government : खूप दिवसांच्या विश्रांती नंतर आज विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा आपल्या कामात ऍक्टिव्ह झाले आहेत. ते आज बंडांच्या चर्चा थंडावल्या नंतर पुण्यात पहिल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताने मृत्यू झालेल्या या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राज्यपाल यांना पत्राद्वारे केली आहे. त्यामधील काही क्लिपा बाहेर पडत आहे. त्यामध्ये दिसत आहे की लोक आरडा ओरडा करत आहेत. लोक एकमेकांच्या अंगावरून जात आहेत. त्या क्लिप वरून तरी असे वाटते की तेथे चँगराचेंगरी झाली असावी असे यावेळी अजित पवार म्हणाले.
तेथील लोकांच्या मृत्यूचा आकडा नेमका किती आहे. हे अद्याप समोर आलेले नाही. हा सरकारी कार्यक्रम आहे ही सगळी सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे का कार्यक्रम कोणाच्या हट्टा पाई हे केले गेले. कोणाचा सोईने हा कार्यक्रम करण्यात आला आहे. ही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.
‘त्या शंका-कुशंका…’ बंडाच्या चर्चांवर अजित पवार पुन्हा म्हणाले…
तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार या कार्यक्रमाला खर्च किती झाला याची देखील चौकशी झाली पाहिजे. हा कार्यक्रम म्हणजे सरकारचा सर्वाधिक पैसा खर्च केलेला कार्यक्रम आहे. असे यावेळी अजित पवार म्हणाले. या कार्यक्रमाची योग्य ती न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. तसे पत्र देखील मी राज्यपालांना दिले आहे. आम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण आणता नाही. परंतु यामध्ये लोकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे लोकांसमोर याची सत्यता आली पाहिजे. योग्य ती माहिती समोर आली तर चर्चा थांबतील. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करून लोकांना सत्य काय आहे हे सांगितले पाहिजे. असे अजित पवार या वेळी म्हणाले. ते आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.