‘त्या शंका-कुशंका…’ बंडाच्या चर्चांवर अजित पवार पुन्हा म्हणाले…

‘त्या शंका-कुशंका…’ बंडाच्या चर्चांवर अजित पवार पुन्हा म्हणाले…

Ajit Pawar Press Conference : विरोधी पक्ष नेते अजित पवार नाराज नसल्याचे तसेच ते भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याते त्यांनी माध्यमांसमोर येत सांगितले असले तरी, अजूनही यावरील चर्चा काही केल्या थंडावताना दिसून येत नाहीये. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणा असे अजितदादांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतर देखील शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान केले आहे. ते म्हणाले की, गुण जुळले की वेळ पुन्हा येईल असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे एकदिवस आधी काहीशा थंडावलेल्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान आज पुण्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बंडाच्या चर्चा काहीशा थंडावल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी पुन्हा एकदा बंडाच्या चर्चांवर अजित पवार यांना प्रश्न विचारला असता. त्यांनी पुन्हा सांगितलं की, ‘त्या शंका-कुशंका डोक्यातून काढू टाका. मी गेल्या 30-32 वर्ष राजकारणात आहे. कधी दोन महत्त्वाचे कार्यक्रम असतील तर काही जण इकडे काही जण तिकडे जात असतात. त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. तसं काही नाही.’ असंही यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Ajit Pawar : कुठलाही भूकंप सांगून येत नाही, बंडावर अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य

दरम्यान बुधवारी अजित पवार (Ajit Pawar) भारतीय जनता पार्टीत जाणार असल्याच्या चर्चांना स्वतः माध्यमांसमोर येत पूर्णविराम दिला होता. ते म्हणाले की, मी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या काही सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण केला जात आहे. ज्या बातम्या दाखविल्या जात आहेत, त्यात काहीच तथ्य नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी बोलताना अजित पवारांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांसह इतर पक्षांच्या प्रवक्त्यांवर निशाणा साधला. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. दरम्यान आमची भूमिका मांडण्यासाठी आमच्या पक्षाचा प्रवक्ते, नेते मजबूत असल्याचंही त्यांनी राऊतांना उद्देशून कडक शब्दांत हल्लाबोल केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube