Download App

‘रोजगार अन् महागाईसाठी कब्र खोदली, सुपारी दिली’ ; काँग्रेस नेत्याची मोदींवर आगपाखड

Atul Londhe : देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि वाढत चालेल्या इंधनाच्या दरावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. लोंढे म्हणाले, की ‘मोदीजी, बरोबर आहे कब्र तर खोदली गेली आहे सुपारी पण दिली गेली आहे पण कोणाची ?, तर या देशातील युवक जे रोजगार मागत आहेत त्या रोजगाराची.’ ‘मध्यमवर्गीयांना महागाईमुळे घर कसे चालवावे ? असा प्रश्न पडला आहे त्या महागाईसाठी कब्र खोदली आहे आणि सुपारी पण दिली आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘आज देशात महागाई प्रचंड वाढली असून त्याची कब्र खोदली आहे. कच्चे तेल जगभरात स्वस्त झालेले असताना आपल्याकडे मात्र या तेलावर कर लावले गेले आहेत. त्यामुळे इंधनाचे भाव कमी झालेले नाहीत. म्हणून मोदीजी बरोबर आहे कब्र तर खोदली गेली आहे. या देशाच्या अर्थव्यवस्थेची.’

साईबाबा हे ‘देव’ नाहीत, बागेश्वर बाबा बरळले

‘भाजपने तर देश बर्बाद करण्याचीच सुपारी घेतली आहे. त्यामुळे आता आपण कितीही कांगावा केला, देशभरात कितीही दंगली घडवल्या जे आता दिसत आहे पण, एक मात्र सत्य आहे आपण आपले अपयश लपवू शकत नाही. कोणत्याही भावनिक मुद्द्यांच्या आधारे आपण आपले अपयश आता लपवू शकत नाही कारण, सत्य काय आहे ते या देशापुढे आले आहे’, अशा शब्दांत लोंढे यांनी मोदी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला.

मोदीच तारणहार ! कर्नाटक राखण्यासाठी करणार तुफान प्रचार; ‘हा’ आहे भाजपचा प्लॅन

दरम्यान, देशभरात सध्या महागाई वाढली आहे. इंधनाचे भावही प्रचंड वाढले आहेत. मध्यंतरी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी तेल कंपन्यांना आवाहन केले होते की जर कंपन्यांचा तोटा भरून निघाला असेल तर कंपन्यांनी इंधनाचे भाव करून जनतेला दिलासा द्यावा. मात्र, त्यांच्या या आवाहनाचा काहीच उपयोग झाला नाही. एकाही कंपनीने तेलाचे भाव कमी केले नाहीत. नागरिकांना आजही महाग इंधन खरेदी करावे लागत आहे. या मुद्द्यानवर विरोधक सरकावर जोरदार टीका करत आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज