Download App

Corona Update : नगर, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांनी वाढवली कोरोनाची धास्ती; पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या वर

  • Written By: Last Updated:

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये गेले काही महिने कोरोनाच्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली होती. पण आता त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिलह्यांमध्ये कोरोनाची रुगसंख्या वाढत चाललेली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला असून यासंबंधीच्या सूचना जारी केल्या आहेत.

Twitter नंतर आता Facebook वरही पेड व्हेरिफिकेशन बॅच, इतके पैसे मोजावे लागतील

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सांगली, नाशिक, अकोला व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. महाराष्ट्रात सध्या 1,308 रुग्ण सक्रीय असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

रविवारी राज्यात एकुण 236 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची एकुण रुग्णसंख्या 81,39,737 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 92 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात 79,90,001 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यामध्ये सध्या 98.16 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे तर 1.82 टक्के मृत्यू दर आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाची सुनावणी ३ आठवड्यांनी पुढे; निवडणुका पावसाळ्यानंतर होणार?

मुंबईमध्ये 52 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत तर, ठाण्यामध्ये 33 नवे कोरोना रुग्ण बाधित झाले आहेत. पुणे येथे 69, नाशिकमध्ये 21, कोल्हापूर व अकोल्यात 13-13, संभाजीनगर येथे 10 आणि नागपूर येथे 2 रुग्ण आढळले आहेत.

Tags

follow us