Twitter नंतर आता Facebook वरही पेड व्हेरिफिकेशन बॅच, इतके पैसे मोजावे लागतील
Twitter नंतर आता फेसबुकनेही आपली पेड व्हेरिफिकेशन सर्व्हिस लॉन्च केली आहे. काही दिवसापासून मेटा अशी सर्व्हिस आणणार असल्याच्या चर्चा होत्या. सध्या अमेरिकेमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. त्यामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम यूजर्स पेड व्हेरिफिकेशन बॅच मिळवू शकतात.
इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये पेड व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. आता या लिस्टमध्ये इतर प्लॅटफॉर्म्स देखील येत आहेत. मेटा व्हेरिफिकेशननंतर युझर्सना आपल्या अकाउंटला ब्लु टिक मिळेल. ती मिळवण्यासाठी युझर्सना सपुरावा म्हणून सरकारी आयडी आणि 11.99 डॉलर म्हणजे (सुमारे 990 रुपये) दरमहा खर्च करावा लागेल. ही किंमत वेब व्हर्जनसाठी आहे. तर Apple iOS किंवा Android प्लॅटफॉर्मसाठी युझर्सना 14.99 रुपये (सुमारे 1,240 रुपये) खर्च करावे लागतील.
मेटा कडून या सर्व्हिससाठी बराच काळापासून खल सुरु होता. अमेरिकेत लॉन्च करण्यापूर्वी मेटाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ही सेवा आणली होती. यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅट आणि मेसेजिंग अॅप टेलीग्राम यांनीही त्यांची सशुल्क सेवा सुरू केली होती.