Download App

‘शिंदेंनी मला गृहमंत्री केले, मीच गृहमंत्री राहणार’; फडणवीसांनी ठणकावले !

Devendra Fadnavis replies Supriya Sule : राज्यात रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा परिसरात दंगल उसळली होती. या घटना तसेच खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर गृहमंत्रालयाच्या कारभाराचे अपयश असल्यामुळे फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.

त्यावर आता फडणवीस यांनी खोचक उत्तर दिले आहे. फडणवीस यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांना मिळालेल्या धमकी प्रकरणी महत्वाची माहिती दिली. तसेच खासदार सुळे यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.

मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

फडणवीस म्हणाले, मला याची पूर्ण कल्पना आहे की मी मुख्यमंत्री झाल्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. अनेकांना मनातून वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल. मी त्या सगळ्यांना इतकंच सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे. याआधीही मी गृहमंत्रीपद सांभाळले आहे.

मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रालयाचा कार्यभार दिला आहे. जे कुणी चुकीचे काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्रीपद मी याआधीही पाच वर्षे सांभाळलं आहे. यापुढेही जे लोक अवैध कामे करतील त्यांना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ? 

राज्यात दंगली होणेही गंभीर आहे. गृहमंत्रालयाचे हे मोठे अपयश आहे.  गृहमंत्री फडणवीस यांना गृहमंत्रालय झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.’

‘लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय ?’

‘महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना एका व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. देशातील एका लोकप्रतिनिधीला जर अशाप्रकारे धमकी दिली जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे.’

केंद्र तसेच महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा देण्याची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी’,  अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

Tags

follow us