Download App

पेटलेलं पाणी ‘असं’ होईल शांत; फडणवीसांनी विधिमंडळात सांगितला मेगा प्रोजेक्ट, वाचा..

Devendra Fadnavis : विधिमंडळ अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी जलसंधारणातील (water conservation) कामे आणि आगामी काळात जलसंपदा विभागाने कोणते प्रकल्प हाती घेतले आहेत, हे प्रकल्प किती कालावधीचे आहेत, यामुळे नगर विरुद्ध मराठवाडा किंवा अन्य ठिकाणचे पाण्याचे संघर्ष कसे मिटतील हे सांगितले.

फडणवीस म्हणाले, की पैनगंगा-वैनगंगा प्रकल्पाच्या माध्यमातून 62 टीएमसी पाणी मिळणार आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार आहे. आता त्यात वाशीम जिल्ह्याचा समावेश करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी, तापी खोऱ्यात आणण्यासाठी दमणगंगा पिंजाळ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यातून मुंबईला पाणीपुरवठा होईलच पण मराठवाड्याला मोठा लाभ होणार आहे. नारपार गोदावरी, गिरणा, तापी पुनर्भरण, मराठवाडा स्थिरीकरण असे अनेक प्रकल्प आहेत. ज्याद्वारे पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

satyajeet tambe ; जुनी पेन्शन लागू करणं शक्य, अधिकाऱ्यांकडून सरकारची दिशाभूल

जिगाव प्रकल्पाला यावर्षी निधी देण्यात आला आहे. भूसंपादनाची कामे करण्यासाठी सुद्धा निधी देण्यात आला आहे. जिगाव प्रकल्पाला 900 कोटी दिले, भुसंपादनासाठी 700 कोटी अधिकचे देत आहोत. सन 2024 मध्ये कामकाज सुरू होईल. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाची संकल्पना तयार करण्यात आली. खारपान पट्ट्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

पावसाळ्यात तापीचे पाणी मध्य प्रदेश व महाराष्ट्रात व डावा कालवा काढून खारपाण पट्ट्यात पाणी आणणे शक्य होईल. आंतरराज्य प्रकल्प असल्याने यासाठी केंद्र सरकार पैसे देणार आहे.  19.37 अब्ज म्हणजेच 20 टिएमसी पाणी महाराष्ट्राला व मध्यप्रदेशला 11 टिएमसी पाणी मिळणार असून या प्रकल्पाचे कामकाज आता बरेच पुढे गेले आहे.

अनिल परब यांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा, कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

जलसंपदा विभागाकडून मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. सात ते  आठ वर्षे कालावधीचे हे प्रकल्प आहेत. पण दीड ते दोन वर्षांत प्रकल्प सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून नगर विरुद्ध मराठवाडा असो किंवा राज्यातील अन्य ठिकाणचे पाण्याचे संघर्ष आपण मिटवणार आहोत. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारावा लागेल मात्र सरकार ते ही करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Tags

follow us