Maharashtra Elections Exit Polls 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. विविध संस्थांच्या या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही संस्थांनी राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता हे अंदाज किती खरे ठरतात याचं उत्तर 23 तारखेला मिळणारच आहे. मात्र या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किती जागा मिळू शकतात याची माहिती घेऊ या..
पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाला 16 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे.
इलेक्टोरल एजनुसार ठाकरे गटाला 44 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजी संस्थेच्या एक्झिट पोलनुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 35 उमेदवार निवडून येण्याची शक्यता दिसत आहे.
लोकशाही रुद्र एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किमान 20 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काही एक्झिट पोल्सने शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाला जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
Exit Poll : 2019 मध्ये किती खरे ठरले होते निवडणुकीचे अंदाज?, वाचा सविस्तर..
महायुती – 122 ते 186
भाजप – 77 ते 108
शिवसेना (शिंदे गट) – 27 ते 50
राष्ट्रवादी (अजित पवार) – 18 ते 28
मविआ – 69 ते 121
काँग्रेस – 28 ते 47
शिवसेना (ठाकरे गट) – 16 ते 35
राष्ट्रवादी (शरद पवार) – 25 ते 39
इतर – 12 ते 29
महायुती – 152 ते 160
भाजप – 90
शिवसेना (शिंदे गट) – 48
राष्ट्रवादी (अजित पवार) – 22
मविआ – 130 ते 138
काँग्रेस – 63
शिवसेना (ठाकरे गट) – 35
राष्ट्रवादी (शरद पवार) – 40
इतर – 6 ते 8