Download App

Exit Poll : 2019 मध्ये किती खरे ठरले होते निवडणुकीचे अंदाज?, वाचा सविस्तर..

Maharashtra Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. विविध संस्थांच्या या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही संस्थांनी राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता हे अंदाज किती खरे ठरतात याचं उत्तर 23 तारखेला मिळणारच आहे. मात्र त्याआधी मागील निवडणुकीतील एक्झिट पोल कितपत खरे ठरले होते याची माहिती घेऊ या..

विदर्भात मविआला फटका, महायुती मारणार मुसंडी, एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा?

2019 मधील निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 105 जागा जिंकल्या होत्या आणि राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या. काँग्रेसने 44 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकी दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अविभाजित होते. यानंतर मात्र या दोन्ही पक्षांत फूट पडली होती.

या निवडणुकीतही विविध संस्थांनी एक्झिट पोल दिला होता. इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार एनडीए चांगले प्रदर्शन करील अशी शक्यता होती. यामध्ये 166 ते 194 जागा मिळतील असे सांगितले होते. तर युपीए आघाडीला 72 ते 90 जागा मिळतील असे सांगण्यात आले होते.

न्यूज 18 आयपीएसओएस एक्झिट पोलनुसार एनडीए 243 जागा मिळविल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर युपीएला फक्त 41 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या प्रकारे रिपब्लिक जन की बातने एनडीएला 216 ते 230 तर युपीए आघाडीला 52 ते 59 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. टाइम्स नाउने एनडीएला 230 आणि युपीए आघाडीला 48 जागांचा अंदाज व्यक्त केला होता. एबीपी सी वोटर सर्व्हेने एनडीएला 204 आणि युपीए आघाडीला 69 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

आताचे एक्झिट पोल सांगतात महायुतीचं सरकार

चाणक्य स्ट्रॅटेजीनेही महाराष्ट्र निवडणुकीचे अंदाज दिले आहेत. यानुसार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असा अंदाज चाणक्यने व्यक्त केला आहे. सहा ते आठ जागा अपक्षांना आणि अन्य पक्षांना मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मेघ अपडेट्सच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील असा मेघ अपडेट्सचा अंदाज आहे. अपक्ष आणि अन्य पक्षांना आठ ते दहा जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पुन्हा महायुती सरकार? भाजप सर्वात मोठा पक्ष; एक्झिट पोलचा अंदाज काय

follow us