विदर्भात मविआला फटका, महायुती मारणार मुसंडी, एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा?

  • Written By: Published:
विदर्भात मविआला फटका, महायुती मारणार मुसंडी, एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा?

Maharashtra Exit Poll: गेल्या पाच वर्षांतील नाट्यमय घडामोडींनंतर आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) मतदान झाले. राज्यातील दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान, आता मतदानानंतरच्या चाचणीचे म्हणजे एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत. झी 24 तासच्या जेनिया एआयच्या एक्झिट पोलने (Zeenia AI Exit Poll) विदर्भात महायुती (Mahayuti) मुसंडी मारले, असा अंदाज वर्तवला आहे.

Jharkhand Election Exit Poll Result 2024 : एक्झिट पोलचा काँग्रेसला धक्का, झारखंडमध्ये भाजप सरकार 

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात 10 पैकी 2 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र, Zeenia AI एक्झिट पोलनुसार, लोकसभेतील पिछेहाटीनंतर महायुतीचं विदर्भात जोरदार कमबॅक करणार असल्याचा अंदाज आहे. Zeenia AI एक्झिट पोलनुसार महायुतीला 32 ते 37 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला 24 ते 29 जागांवर समाधान मानावे लागणार आहे

Zeenia AI Exit Poll चाअंदाज
विदर्भ – 62
महायुती – 32-37
मविआ – 24-29
इतर – 00-02

तर मराठवाड्यात महायुतीला 16-21 जागा, महाविकास आघाडीला 24-29
जागा वर्तवण्यात आल्या.

मॅट्रीझचा पोल काय सांगतोय़
मॅट्रीझच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येऊ शकतं. महायुती जवळपास 150 ते 170 जागा जिंकू शकते. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे.

पीपल्स पल्सचा अंदाज सांगतो की महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अन्य पक्ष आणि अपक्षांना 2 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चाणक्यचा पोल सांगतोय महायुतीचं सरकार
चाणक्य स्ट्रॅटेजीनेही महाराष्ट्र निवडणुकीचे अंदाज दिले आहेत. यानुसार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असा अंदाज चाणक्यने व्यक्त केला आहे. सहा ते आठ जागा अपक्षांना आणि अन्य पक्षांना मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील जनतेने कोणाला कौल दिला, हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube