राज्यात पुन्हा महायुती सरकार? भाजप सर्वात मोठा पक्ष; एक्झिट पोलचा अंदाज काय

Maharashtra Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सरासरी टक्के मतदान झाले आहे. यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. मॅट्रीझच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येऊ शकतं. महायुती जवळपास 150 ते 170 जागा जिंकू शकते. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 […]

Mahayuti

Mahayuti

Maharashtra Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सरासरी टक्के मतदान झाले आहे. यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. मॅट्रीझच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येऊ शकतं. महायुती जवळपास 150 ते 170 जागा जिंकू शकते. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे.

पीपल्स पल्सचा अंदाज सांगतो की महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अन्य पक्ष आणि अपक्षांना 2 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 चाणक्यचा पोल सांगतोय महायुतीचं सरकार

चाणक्य स्ट्रॅटेजीनेही महाराष्ट्र निवडणुकीचे अंदाज दिले आहेत. यानुसार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असा अंदाज चाणक्यने व्यक्त केला आहे. सहा ते आठ जागा अपक्षांना आणि अन्य पक्षांना मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मेघ अपडेट्सच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील असा मेघ अपडेट्सचा अंदाज आहे. अपक्ष आणि अन्य पक्षांना आठ ते दहा जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पोल डायरीने निवडणुकीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थानापन्न होण्याची शक्यता आहे. महायुती 122 ते 186 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महाविकास आघाडीला 121 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रिपब्लिकनेही राज्यातील निवडणुकीत महायुतीला कौल दिला आहे. या अंदाजानुसार महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेस नेतृत्वातील महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

Exit mobile version