Maharashtra Assembly Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी (Maharashtra Assembly Elections 2024) केल्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर मविआने लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने (INDIA Alliance) देशभरात जो फॉर्म्युला वापरला तोच फॉर्म्युला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत वापरायचं महाविकास आघाडीनं ठरवलं आहे. या फॉर्म्युल्याने लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी अभेद्य राहिली अन् चांगली कामगिरी केली. तसाच प्रयत्न राज्यात होणार हे जवळपास नक्की झालं आहे. महाविकास आघाडी राज्यातील विधानसभा निवडणूक एकत्र लढतील पण त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही. निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
“आता विरोधकांनाही जास्त संधी द्याल” बिर्लांना शुभेच्छा देत राहुल गांधींचीही कडी
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने एका रणनीतीअंतर्गत पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. याचा फायदा असा झाला की सत्ताधारी भाजपला (BJP) पंतप्रधान मोदींबरोबर विरोधी पक्षातील (PM Narendra Modi) कुणा नेत्याची तुलनाच करता आली नाही. जर राहुल गांधींना (Rahul Gandhi) पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केलं असतं तर निकालानंतरचं चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं. कारण याआधी 2019 च्या निवडणुकीत असा प्रयोग काँग्रेसने करून पाहिला होता. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत ही चूक पक्षाने टाळली.
दुसरे महत्वाचे म्हणजे जर काँग्रेसने यंदा (Congress Party) कुणाचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केले असते तर आघाडीतील अन्य पक्षांनी या नावाला कितपत समर्थन दिलं असतं याबाबत शंका होतीच. त्यामुळे हा प्रयोग आघाडीने यंदा टाळला. त्याचा परिणामही चांगला झाला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या जागा वाढल्या. भाजपला मोठा धक्का बसला. आता हीच रणनीती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्रात राबवायचं ठरवल्याचं दिसत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मविआने महायुतीला जोरदार झटका देत दमदार कामगिरी केली. काँग्रेस 13 जागा जिंकून राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही स्ट्राईक रेट चांगला राहिला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेही नऊ जागांवर यश मिळवलं. जशी आघाडी लोकसभेत अभेद्य राहिली तशीच विधासनसभेतही राहिल याची काळजी तिन्ही पक्षांकडून घेतली जात आहे.
मोठी बातमी : लोकसभा अध्यक्षपदी ओमप्रकाश बिर्लांची पुन्हा निवड; ‘इंडिया’ आघाडीची खेळी फेल
मध्यंतरी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्याचा पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असे वक्तव्य करुन आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काँग्रेस नेत्यांनी पुन्हा अशी वक्तव्ये करू नयेत याची काळजी घेण्यात आली. राहुल गांधी यांनीही दिल्लीतील बैठकीत मित्र पक्ष नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या होत्या यानंतर काँग्रेस नेत्यांनी सध्या तरी अशी वक्तव्ये टाळल्याचे दिसत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. आघाडीतील तीन पक्ष प्रत्येकी 96 जागा लढतील असं सांगितलं जात आहे. या निवडणुकीसाठी मुख्यमत्रिपदाचा चेहरा दिला जाणार नाही. निवडणुकीत तिन्ही पक्षाला किती जागा मिळतील त्यानुसार मुख्यमंत्रिपदाबद्दलचा निर्णय घेतला जाईल अशी रणनीती आहे.