Download App

Video : लाडकी बहीण योजनेतील बदल, स्मार्ट मीटर, अन्…; फडणवीसांनी सभागृहात काय काय सांगितलं….

Devendra Fadanvis यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना स्मार्ट मीटर, रोजगार अन् पेपर फुटी अशा विविध विषयांची माहिती दिली

Devendra Fadanvis on Smart Meter, Employment and Paper Leak : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना विविध विषयांची माहिती दिली की, परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात (Paper Leak) एक कायदा तयार करण्यात येत आहे. आमच्या सरकारने पारदर्शक नोकर भरती करून एक रेकॉर्ड तयार केलं. तसेच सर्वसामान्य ग्राहकांना हे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही. लाडकी बहिण योजनेतील बदलांबाबत देखील यावेळी फडणवीसांनी माहिती दिली. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना ही माहिती दिली.

Punit Balan: श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा जिर्णोद्धार, बालन दांपत्याच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने पारदर्शक नोकर भरती करून एक रेकॉर्ड तयार केलं. तसेच यामध्ये एकही पेपर फुटीची घटना घडलेली नाही. जे काही गैरप्रकार होते. ते पेपर फुटीचे नव्हते. तर कॉपी केस, उमेदवार, इलेक्ट्रिक डिव्हाइसेसचा वापर अशा तक्रारी आहेत. तरी देखील आम्ही एका विद्यार्थाच्या हॉल तिकीटवर काही आकडे लिहिल्याचा गैर प्रकार आढळून आल्याने जलसंधारण खात्याची परीक्षा रद्द केली.

Amol Kolhe दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर शरद पवारांकडून मोठी जबाबदारी!

मात्र मागच्या सरकारमध्ये देखील असे प्रकार अनेकदा आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे की, परीक्षांमधील गैरप्रकार आणि विरोधात एक कायदा तयार करण्यात येत आहे. या अधिवेशनामध्येच हा कायदा येणार आहे. जेणेकरून पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेता येतील. तर नोकर भरतीवर पुढे बोलताना फडणवीस यांनी म्हटलं की, राज्यसरकारने राज्यभर रोजगार मेळाव्यांचं आयोजन केलं. तसेच पोलीस भरती आणि विविध योजनांच्या माध्यमांतून तरूणांना दिला जाणारा रोजगार याची माहिती दिली.

तर स्मार्ट मीटर बाबत बोलताना ते म्हणाले की, देखील विरोधकांकडून राज्यांमध्ये खोटं नॅरेटिव्ह सेट केले जात आहे. मात्र स्मार्ट मीटर सहित आर डीएसएसची योजना ही महाविकास आघाडीच्या काळातच सुरू झाली होती. तसेच विरोधकांकडून एका विशिष्ट कंपनीला याचं कंत्राट दिल्याचा आरोप केला जातो. मात्र आम्ही वेगवेगळ्या पाच कंपन्यांना हे कंत्राट दिलं आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत हे मीटर आपल्याकडे कमी किमतीत आहे.

तसेच राज्य सरकारने या स्मार्ट मीटर बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना हे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही. त्यामुळे विरोधकांनी हा खोटा नॅरेटिव्ह बंद करावं. तर स्मार्ट मीटर हे केवळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या घरी, त्याचबरोबर सिस्टीम मीटरिंगच्या अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फिडरवर तसेच वितरण रोहित्रांवर, डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर तसेच सर्व सरकारी कार्यालयांमध्ये बसवण्यात येणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

Manipur Violence : ‘मणिपूरचा इतिहास समजून घ्या’; पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावलं…

लाडकी बहिण योजनेतील बदलांबाबत देखील यावेळी फडणवीसांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यातील वयाची अट ही 21 ते 60 वरून आता 21 ते 65 वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. त्याचबरोबर संबंधित महिलेच्या नावावर पाच एकर जमीन असावी ही अट देखील काढण्यात आली आहे. योजनेसाठी अर्ज करण्यासाठीचा कालावधी देखील वाढवला आहे. राहिवासी दाखला आणि उत्पन्नाच्या दाखल्याबाबतचे अट देखील बदलण्यात आली असल्याचं फडणवीस म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज