Maharashtra : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra) छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त एक खास उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवप्रेमी आणि नाट्यप्रेमींची उत्सुकता शिगेला गेली आहे. काय आहे हा उपक्रम? जाणून घ्या…
Sanjay Raut : ‘EVM नको, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’; राऊतांचे मोदी सरकारला आव्हान
या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर महानाट्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. जून 2024 च्या आत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या महानाट्यांचे प्रयोग होणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्यास सरकारकडून सांगण्यात येते.
Trending Song: 2023 मध्ये इंस्टाग्रामवर वर्चस्व गाजवणारे बॉलीवूडचे 5 चार्ट-टॉपर्स गाणी
तसेच महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा 6 जून 2024 ला साजरा होणार आहे. तर दोन जून ते सहा जून या दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या सर्व उपक्रमासाठी तब्बल 40 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. कारण महाराजांच्या आयुष्यावरील महानाट्य म्हटलं की, आकर्षक प्रकाश योजना, घोडे बैलगाडी, अडीचशे हुन अधिक कलाकार, नेत्र दीपक आतषबाजी आणि अनेक रोमहर्षक प्रसंग यांचा समावेश होतो. त्यामुळे शिवप्रेमी आणि नाट्यप्रेमी मध्ये देखील या उपक्रमाची उत्सुकता शिगेला गेली आहे.
Nana Patekar : बाळासाहेबांनंतर मातोश्रीशी संबंध संपला; राज-उद्धव ठाकरेंवर नाना पाटेकर नाराज
दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हे रणनीती आखण्यात येत असल्याचे देखील विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी त्या त्या जिल्ह्यातील नामवंत मंडळींना देखील बोलावण्यात येणार आहे.