Sanjay Raut : ‘EVM नको, बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊनच दाखवा’; राऊतांचे मोदी सरकारला आव्हान

Sanjay Raut : ‘EVM नको, बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊनच दाखवा’; राऊतांचे मोदी सरकारला आव्हान

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर (Sanjay Raut) आहेत. राऊतांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले असतानाच राऊतांचा हा नाशिक दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. आज राऊतांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधत खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरून (MP Suspension) केंद्र सरकारला फैलावर घेतले. विरोधकांचं काम आहे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचा. जर प्रश्नांचं उत्तर मिळत नाही तर आम्ही उभ राहून प्रश्न विचारणार. तो संविधानाने आम्हाला दिलेला हक्क आहे. अमित शाह यांनी संसदेत येऊन संसदेत घुसखोरी (Parliament Security Breach) कशी झाली? याचं उत्तर दिलं पाहिजे मात्र ते त्यांची उत्तरं बाहेर देतात. ईव्हीएम आहे तर सर्व मुमकीन आहे. त्यांना ईव्हीएमवर मोठा विश्वास आहे. आमचं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. पण, ऐकत नाहीत. कारण तु्म्ही हरणार, अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली.

संजय राऊतांना धक्का! कोविड घोटाळ्यात पाटकर अन् भागीदारांची 12 कोटींची संपत्ती जप्त

व्हीएम आहे तर सर्व मुमकीन आहे. त्यांना ईव्हीएमवर मोठा विश्वास आहे. आमचं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. पण, ऐकत नाहीत. कारण तु्म्ही हरणार आहात. अन्य देशांत बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. तुम्ही स्वतःला महाशक्ती मानत आहात. या ठिकाणी तु्म्ही निवडणुका बॅलेट पेपरवर का घेत नाही, असा सवाल राऊत यांनी केला.

महाविकास आघाडी केदार यांच्या पाठिशी उभी 

सुनील केदार हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. लढवय्ये नेते आहेत. भाजपाचे असे अनेक नेते आहेत त्यांच्यावर असे अनेक खटले चालले पाहिजेत, कारवाया झाल्या पाहिजेत. पण न्यायालयावर दबाव असल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच कारवाया होत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. सुनील केदार यांच्यासोबत पूर्ण महाविकास आघाडी उभी आहे. EVM वापरा मात्र VVPT चा शंभर टक्के वापर करा. बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊनच दाखवा असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.

Sanjay Raut : भाजपाच्या जावयाला मुंबई गिळायचीय; अदानींविरोधात रस्त्यावर उतरण्याचा राऊतांचा इशारा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube