Sanjay Raut : ‘भाजपाच्या जावयाला मुंबई गिळायचीय’; अदानींविरोधात रस्त्यावर उतरण्याचा राऊतांचा इशारा

Sanjay Raut : ‘भाजपाच्या जावयाला मुंबई गिळायचीय’; अदानींविरोधात रस्त्यावर उतरण्याचा राऊतांचा इशारा

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (Sanjay Raut) पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचे नाव घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गौतम अदानी (Gautam Adani) भाजपाचे जावई आहे. भाजपाच्या जावयाला मुंबई गिळायची आहे मात्र आम्ही हे होऊ देणार नाही. उद्या धारावी बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा खासदार राऊत यांनी दिला. मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचं काम राज्य सरकारने अदानी उद्योग समूहाकडे सोपवलं आहे. यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. आज खासदार राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

राऊत म्हणाले, धारावीसाठी मोर्चा काढणारच आहोत. हा मोर्चा फक्त धारावीसाठी नाही तर मुंबईकरांसाठी आहे. या मोर्चासाठी हजारो मुंबईकर उपस्थित राहतील. सगळ्यांवर ताबा मिळवण्यासाठी भाजपाचं हे सगळं सुरू आहे. देशाचे उद्योगपती जावयांना मुंबई गिळायची आहे पण आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.

Sanjay Raut : ‘तीन घाशीराम सरकार चालवतात, भाजपाकडे नैतिकताच नाही’ राऊतांचा हल्लाबोल

संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी काल 15 खासदारांना निलंबित करण्यात आले. यावरही राऊतांनी भाष्य केलं. संसदेत घुसखोरीची जी घटना घडली ती वाईटच आहे. ज्या खासदारानं पत्र लिहिलं. त्याची साधी चौकशी सुद्धा नाही. पण प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना तुम्ही निलंबित करता. पण ज्यांच्यामुळे हे घडलं त्याला साधी नोटीसही नाही. याला काय म्हणायचं असा सवाल उपस्थित करत आज आम्ही विरोधी पक्षांचे नेते एकत्र येत पुढील रणनीती ठरवणार आहोत. मोदी सरकारची ही सरळसरळ दडपशाही सुरू आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत 40 पेक्षा जास्त जागा जिंकू 

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्यात जागावाटप झालं आहे. राज्यात आम्ही उत्तम समन्वय ठेऊन काम करत आहोत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आम्ही राज्यात 40 प्लस जागा जिंकू असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

Sanjay Raut : उद्धव ठाकरे PM पदाचा चेहरा? राऊतांनी ‘सस्पेन्स’ ठेवला कायम

..तर शिवसेना हा कट हाणून पाडील- उद्धव ठाकरे 

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदानी उद्योग समुहाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार उद्या (16 डिसेंबर) धारावी बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. या प्रकल्पातून स्थानिक लोकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. धारावी पुनर्विकासात धारावीतील रहिवासी नागरिकांन फक्त 300 चौरस फुट देऊ, असे सांगण्यात येत आहे. मात्र या लोकांना 400 ते 500 चौरस फुटांची घरे मिळायला हवीत. त्यासाठी येथे योग्य पद्धतीने सर्वेक्षण व्हायला हवे. धारावीकरांना धाक दाखवून, दडपशाही किंवा दमदाटीच्या जोरावर सर्वेक्षण केलं तर शिवसेना हा कट हाणून पाडील, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube