Download App

मोठी बातमी! ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 18 मे रोजी मतदान

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल.

विधानसभा निवडणूक कधी होणार, बावनकुळेंनी महिना सांगून टाकला..

नामनिर्देशनपत्रे 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होईल.

याआधी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आजी माजी महसूलमंत्र्यांच्या गटात लढत पाहायला मिळाली होती. यातच थोरातांच्या गटात विखे गटाने बाजी मारली होती. यामुळे थोरात गटाला मोठा धक्का बसला होता. एकंदरीतच माजी महसूलमंत्र्यांना सध्याचे असलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने जोरदार धक्का दिला होता.

Girish Mahajan : लोक संजय राऊतांकडे जोकर म्हणून बघतात

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात शिंदे गटाला मोठा धक्का बसला होता. महालगावात शिंदे गटाकडून मीना रजनीकांत नजन रिंगणात होत्या, तर ठाकरे गटाकडून रोहिणी नानासाहेब काळे मैदानात होत्या. अंतिम मतमोजणीवेळी रोहिणी काळे यांना 1354 मते पडली असून, मीना नजन यांना 1251 मते पडली आहे. त्यामुळे शिंदे गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायत निकालाकडे संपर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us