दिलासा मिळताच हसन मुश्रीफ थेट ईडी कार्यालयात; ईडीच्या कारवाईवर म्हणाले..

Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी आज तडक ईडीचे कार्यालय गाठले. येथे आल्यानंतर मात्र अधिकारी बाहेर असल्याने त्यांना पुन्हा उद्या बोलावण्यात आले आहे. ईडीला आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, की ईडीने मला जे समन्स बजावले […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (27)

Hasan Mushrif

Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी आज तडक ईडीचे कार्यालय गाठले. येथे आल्यानंतर मात्र अधिकारी बाहेर असल्याने त्यांना पुन्हा उद्या बोलावण्यात आले आहे. ईडीला आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, की ईडीने मला जे समन्स बजावले होते तसेच उच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते त्यानुसार मी येथे आलो. ईडीला जे काही प्रश्न विचारायचे होते त्यांची उत्तरे देण्यासाठी मी येथे आलो होतो. येथे मात्र अधिकारी बाहेर गेले असल्याने कामकाज झाले नाही. त्यांनी मला उद्या पुन्हा बोलावले आहे. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज आटोपून मी उद्या पुन्हा येणार. ईडीचे अधिकारी ज्या ज्या वेळी मला बोलावतील त्या त्या वेळी मी येणार, ईडीला आमच्याकडून चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Pune News : ठाकरे गटाला धक्का; फडणवीसांच्या उपस्थितीत ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश

दरम्यान, आज मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यालालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय, अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.

हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा; कारवाई न करण्याचे आदेश

 

मुश्रीफ यांच्या घरावर शनिवारी पहाटेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, नलावडे साखर कारखाना हा बिक कंपनीने चालवायला घेतला होता. याप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. यासंदर्भात ईडीनं यापूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ईडीकडून धाड टाकण्यात आली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेसह घोरपडे कारखान्याशी संबंधित ही धाड होती.

Exit mobile version