मुंबई : आजपासून (दि.21) राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (State Board of Secondary Higher Secondary Education)घेतल्या जाणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला (Board Exam) सुरुवात होणारंय. या परीक्षेला संपूर्ण राज्यभरातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी (Students) बसणार आहेत. संपूर्ण राज्यात 3,195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
संपूर्ण राज्यभरात परीक्षेदरम्यान 271 भरारी पथकं काम करणार आहेत. सकाळी सत्रातील परीक्षा अकरा वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे साडेदहा वाजता उपस्थित राहायचं आहे तर दुपारच्या सत्रातील परीक्षा तीन वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्र उपस्थित राहणं गरजेचं आहे.
Uddhav Thackeray म्हणतात… निवडणूक आयोगाविरोधात देशभर रान पेटणार!
यंदा परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रा जवळील 100 मीटर अंतरावर झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थी कॉपी करताना पकडल्यास त्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. प्रत्येक तालुक्यात भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. 100 टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी झाडासाठी घेतली जाणार शिवाय चित्रिकरणही केलं जाणारंय.
या परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक हे बैठे पथक म्हणून प्रत्येक केंद्रावर कार्यरत असतील, परीक्षेदरम्यान गोपनीय पाकिटे ते ताब्यात घेतील शिवाय परीक्षेदरम्यान चित्रीकरण करतील. प्रश्नपत्रिकांची गोपनीयता आबाधीत ठेवण्यासाठी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका घेऊन येणारे परिरक्षक यांनी आपली जीपीएस परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत सुरू ठेवणं बंधनकारक असेल.
परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात 25 प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट असेल हे पाकीट उघडताना त्यावर वर्गातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली जाईल त्यानंतर पर्यवेक्षक स्वाक्षरी करून सीलबंद पाकिटातील प्रश्नपत्रिका वितरित केली जातील.