महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ वी मानाची कुस्ती स्पर्धा पुण्यात सुरू आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे. उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
सुरुवातीपासूनच शिवराज राक्षेने आक्रमक खेळ करत ६-० अशा फरकाने आघाडी घेतली होती. त्यानंतर हर्षवर्धनने एक गुण मिळवला पण शिवराज राक्षेने आणखी दोन गुण मिळवले. यात शिवराज राक्षेने ८-१ अशा गुण फरकाने विजय मिळवला.
मॅट विभागात शिवराज राक्षे विजेता
अंतिम लढत महेंद्र वि. शिवराज
मॅटवरील कुस्तीत शिवराज राक्षे आणि माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत सुरू झालीय. यात सुरुवातीपासूनच शिवराज राक्षेने आक्रमक खेळ करत 8-० अशा फरकाने आघाडी घेतली.
पहिल्या फेरीत
हर्षवर्धन सदगीर - 0
शिवराज राक्षे - 8
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीसाठी राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
या लढतीनंतर विजेत्यांची महाराष्ट्र केसरीसाठी लढत होईल. यात हर्षवर्धन सदगीरला डबल महाराष्ट्र केसरी होण्याची संधी असेल.
मॅट विभागात हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्यात लढत
अखेरीस महेंद्र गायकवाडने ५ तर सिकंदर शेखने ४ गुण मिळवले. गुणांच्या फरकाने सिकंदर शेखवर महेंद्र गायकवाडने विजय मिळवला.
महेंद्र गायकवाडला एक तर सिकंदर शेखला पहिल्या फेरीत दोन गुण मिळाले.