Legislative Council Election : गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला होता. महायुती आणि महाविकास आघाडीने 2029 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत या निवडणुकीत उमेदवारांना संधी दिली आहे. 9 जागांसाठी भाजपकडून पाच तर शिवसेना शिंदे गटाकडून 2 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एक आणि महाविकास आघाडीकडून एका जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे मात्र आता निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या निवडणुकीसाठी चार अर्ज अवैध ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
ही निवडणूक बिनविरोध (Legislative Council Election) झाल्याची घोषणा 4 मे रोजी करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 9 जागांसाठी अपक्ष म्हणून चार अर्ज दाखल करण्यात आले होते मात्र ते अर्ज अवैध ठरवण्यात आले असल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपच्या पाचही उमेदवारांसह शिवसेना शिंदे गटाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघडीच्या एका उमेदवाराचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहे. अर्ज वैध ठरल्याने आणि ही निवडणूक आता बिनविरोध होत असल्याने भाजपच्या पाच, शिवसेना शिंदे गटाच्या दोन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येकी एक एक उमेदवारांची आमदारकी पक्की झाली आहे.
‘या’ नेत्यांची आमदारकी पक्की
भाजपकडून प्रमोद जठार, विवेक कोल्हे, माधवी नाईक, संजय भेंडे आणि सुनिल कर्जतकर यांची आमदारकी पक्की झाली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू आणि निलम गोऱ्हे यांची आमदारकी पक्की झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी आणि महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे आता आमदारकीची शपथ घेणार आहे.
लष्करप्रमुख आणि संरक्षण सचिवांच्या वेतनातून कपात करा, उच्च न्यायालयाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
राज्यातील 9 विधानपरिषदेच्या जागांसाठी आणि एका पोटनिवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार होतं आणि त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार होतं मात्र आता ही निवडणूक बिनविरोध झाली असून आता 4 मे रोजी याबाबत निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
