Eknath Shinde Shiv Sena First Candidate List : लोकसभा निवडणुकीत आज शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत .. जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गटानंतर आज अखेर शिंदे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 8 उमेदवारांना तिकीट देण्यात आले. या यादीत दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून खासदार संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाणा मतदारसंघातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, रामटेक मतदारसंघातून राजू पारवे, हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तिकीट दिले आहे. दरम्यान, पहिल्या यादीत खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एकनाथ शिंदे अन् अजितदादांना पाच मतदारसंघात अवघड पेपर; विजयासाठी घाम गाळावा लागणार!
याआधी उद्धव ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर भाजपनेही महाराष्ट्रातील काही उमेदवारांची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार कोणते असतील याची उत्सुकता होती. पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. या यादीत आठ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचेही उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आता लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी#Shivsena pic.twitter.com/PGgRhVMrhK
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) March 28, 2024
शिर्डीत वाकचौरे विरुद्ध लोखंडे
नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघात विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच उमेदवारी मिळाली आहे. यंदा लोखंडेंविरोधात नाराजी वाढली होती. तसेच इच्छुकांचीही गर्दी वाढली होती. तर दुसरीकडे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. मनसेनेही या मतदारसंघावर दावा सांगितला होता. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक होते. परंतु, या सगळ्या चर्चा हवेत विरल्या आहेत. सदाशिव लोखंडे तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरले.
खासदार तुमानेंचा पत्ता कट, पारवे ठरले लकी
रामटेक मतदारसंघात एकनाथ शिंंदे यांनी धक्कातंत्राचा प्रयोग केला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करत नुकतेच शिंदेसेनेत आलेले आमदार राजू पारवेंना संधी दिली आहे. राजू पारवे दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेत आले होते. यानंतर लगेच त्यांना उमेदवारी जाहीर झाली. एका अर्थाने पारवे लकी मॅन ठरले आहेत.
कोल्हापुरात पुन्हा मंडलिकच
कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडीने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली. शाहू महाराजांनंतर महायुती कुणाला तिकीट देणार असा सवाल होता. परंंतु, महायुतीने पुन्हा संजय मंडलिक यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना तिकीट दिले आहे.