Download App

Mahadev Jankar : ‘परभणी’ की ‘माढा’? जानकरांचं ठरलं! दोन्ही मतदारसंघात ठोकणार शड्डू

Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकांची घोषणा लवकरच (Lok Sabha Election) होणार आहे. राज्यात मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा अजूनही संपलेल्या नाहीत. काही जागांवर तिढा निर्माण झाला आहे. असे असले तरी काही जागा अशा आहेत जिथे एकमत झाले आहे. यामध्ये माढा आणि परभणी मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) हे देखील इच्छुक आहेत. मात्र त्यांच्यासाठी महायुती किंवा महाविकास आघाडी हे मतदारसंघ सोडतील याची शक्यता नाही. त्यामुळे आता महादेव जानकर यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. माढा आणि परभणी या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.

Mahadev Jankar : जानकरांना ‘चूक’ उमगली, भाजपला बाजूला ठेवत आखला नवा प्लॅन!

जानकर पुढे म्हणाले, मी मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात गेलो होतो. मी दुसऱ्या मजल्यावर होतो आणि शरद पवार साहेब (Sharad Pawar) पाचव्या मजल्यावर होते. पवार साहेब आणि माझी भेट झाली नाही. त्यांचे आणि माझे संबंध चांगले आहेत. पवार साहेबांशिवाय महाविकास आघाडीतून कुणाचं निमंत्रण नाही. महायुतीमधूनही कुणी निमंत्रण दिलेलं नाही. परभणी आणि माढा या दोन्ही मतदारसंघातून मी अर्ज भरणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी की महायुती कुणाच्या बाजूने लढणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर जानकर म्हणाले, महाविकास आघाडी परभणीची जागा देत नाही आणि महायुती माढ्याची जागा देत नाही. माढ्यात महायुतीचा आणि परभणीत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. त्यामुळे मी स्वतः दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. माढा मतदारसंघाबाबत पवार साहेबांनी मला विचारणी केली आहे असेही जानकर यांनी सांगितले.

Mahadev Jankar : राजकारणातली सर्वात मोठी चूक कोणती? जानकरांनी बेधडक सांगूनच टाकलं

follow us