Mahayuti Manifesto 2024 Maharashtra : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीचे पुढील मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. भाजपचा संकल्पपत्राचे प्रकाशन आज झाले. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नावर (Manifesto) उत्तर देताना अमित शाह यांनी पुढील मुख्यमंत्री कोण? हे सांगितले.
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? शिराळ्यात अमित शहांनी भर सभेत दिले संकेत
संकल्पपत्र असे लागू होणार
महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावर अमित शाह म्हणाले, सध्या महायुतीचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले. महायुतीचं सरकार आल्यावर तीन पक्षांची कमेटी बनणार आहे. ती कमेटी तिन्ही पक्षाचा संकल्पपत्राचा अभ्यास करुन ती लागू करण्याबाबत निर्णय घेणार आहे.
सर्वाधिक दंगे काँग्रेसच्या काळात
महायुतीचे सरकार आल्यानंतर आता धर्मांतरविरोधात कठोर कायदा करणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्याबाबत टीका केली. ते म्हणाले. काँग्रेस सरकार असताना शेतमाल किमान आधारभूत किंमतीवर किती घेतला गेला. आता महायुती सरकार असताना किती घेतला गेला, त्याचा डाटा डाऊनलोड करुन पाहा. तसंच, राज्यात सर्वाधिक जास्त दंगे आघाडीच्या सरकारमध्ये झाले आहेत. काँग्रेसच्या सरकारमध्ये झाले आहेत.
संघावर बंदी आणण्याचे तीन वेळा प्रयत्न काँग्रेसने केले आहे. परंतु प्रत्येक वेळी संघ अधिक मजबूत होऊन पुढे आला आहे. आता तर काँग्रेसची सरकार येणार नाही? यामुळे हा प्रश्नच येत नाही. पूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार येणार आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात अमित शाह यांनी सांगितले.