‘आम्हीही नाराजी व्यक्त केली पण आमच्यावर’.. कायदेंच्या पक्षप्रवेशावर पाटील स्पष्टच बोलले

Gulabrao Patil : ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. मात्र त्याआधीच ही बातमी आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या घडामोडींवर राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव (Gulabrao Patil) पाटील यांनीही भाष्य केले आहे. मनिषा कायंदे या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (83)

Gulabrao Patil

Gulabrao Patil : ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. मात्र त्याआधीच ही बातमी आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या घडामोडींवर राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव (Gulabrao Patil) पाटील यांनीही भाष्य केले आहे.

मनिषा कायंदे या जर ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असतील तर विधानपरिषदेच्या आमदारांत नाराजी होती. आम्ही आमची नाराजी व्यक्त करत होतो तेव्हा आमच्यावर वेगवेगळे आरोप केले. त्यांच्यावर अशी कोणती परिस्थिती आली की त्यांना या काळात राजीनामा द्यावा लागत आहे. कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होतोये, हेच यातून सिद्ध होत आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

निवडणुकीतून माघार! ‘काकागिरी’, ‘दादागिरी’ अन् ‘नानागिरी’ला आशिष देशमुख देणार आव्हान

दरम्यान, याआधी खासदार संजय राऊत यांनी कायंदे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. कोण आमदार? बघा हे जे असे लोक असतात ना हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका बदलला की तोच कचरा पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो. त्याकडे दु्र्लक्ष करा. फार महान लोकं नाहीत ते. अशा लोकांना पक्षात प्रवेश दिला तरी त्यांना महत्वाची पदे देऊ नयेत अशी आमची उद्धव ठाकरेंकडे आग्रहाची मागणी आहे. मागील वर्षभरात आम्ही जो त्रास सहन केला आहे तो अशा लोकांमुळेच सहन केला आहे, असे राऊत म्हणाले होते.

शिवसेनेचा उद्या वर्धापनदिन आहे. या वर्धापनदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच आज शिवसेनेचे (उबाठा) राज्यातील पदाधिकाऱ्यांचे महाशिबीर सुरू आहे. या सगळ्या घडामोडीत आमदाराच्या पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या घडामोडींवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

भाजपचे नेते शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात मला पुरावे देतात; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

Exit mobile version