भाजपचे नेते शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात मला पुरावे देतात; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

भाजपचे नेते शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात मला पुरावे देतात; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

Sushama Andhare : काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या तब्बल पाच मंत्र्यांना भाजप हटवणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे अडचणीत सापडले. काही दिवसांपूर्वी कृषी विभागाकडून टाकण्यात आलेल्या धाडीवरून सत्तार वादात सापडले. हे प्रकरण शांत होत नाहीच तोच ठाकरे गटाकडून कृषी विभागात १५० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप झाला. दरम्यान, आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी भाजप नेते शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात पुरावे जमा करून मला देतात, असा गौप्यस्फोट केला. (Sushma Andhare said, BJP leaders collect evidence against Shiv Sena ministers and give it to me)

शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटानं आज वरळीत शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरात बोलतांना सुषमा अंधारे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मी पंधरा दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, मला भाजपचे काही लोक शिंदे गटाच्या लोकांविरुध्द कागदपत्रे देत आहेत. भाजपच्या एका बड्या नेत्याने मला मराठवाड्यातल्या एक कॅबिनेट मंत्र्यांच्या कारनामान्याची काददपत्रे पुरवली होती. मात्र, दुसऱ्याने आणून दिलेल्या शिकारीवर आम्ही झडप घालत नाही. त्यावेळी त्यांना ते खोट वाटतं होतं. मात्र, अब्दुल सत्तारांचं प्रकरण समोर आल्यावर माध्यमांनी खात्री पटली असावी. अजून एकदा भाजपच्या बड्या नेत्याने शिंदे गटाच्या एका कॅबिनेट मंत्र्याची कागदपत्रे मला दिली आहेत. खात्री पटत नसेल तर आठवडाभरानंतर हा मराठवाड्यातल्या शिंदे गटाच्या त्र्याचं प्रकरण बाहेर येईल, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेस अन् गांधी परिवार ओबीसीद्रोही, भाजप प्रवेशानंतर आशिष देशमुखांचा हल्लाबोल… 

अंधारे म्हणाल्या, शिंदे गट आणि भाजप यांच्यात काहीच सुरळीत नाही आहे. एकमेकांची उणीधुणीच हे काढत आहेत. त्यामुळं शिंदे-फडणवीसांचा लवकरच घटस्पोट होणार आहे, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्यचा महिला पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यावरही अंधारे यांनी भाष्य केलं. अयोध्या पोळ यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध त्यांनी केला. ज्यांच्यात समोरासमोर भिडायची ताकद नसते, ते पाठीमागून वार करत असतात. जे पाठीमागून वार करतात, ते वाघ नाही, तर घाबरट लांडगे असतात, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube