काँग्रेस अन् गांधी परिवार ओबीसीद्रोही, भाजप प्रवेशानंतर आशिष देशमुखांचा हल्लाबोल…
काँग्रेस अन् गांधी परिवार ओबीसीद्रोही असल्याचं म्हणत काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुखांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान, आशिष देशमुख यांनी आज नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेससर राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीला लवकरच मोठी गळती…धमाके पाहायला तयार रहा : भाजपच्या खासदाराने दिला इशारा
आशिष देशमुख म्हणाले, कर्नाटक निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी ओबीसींबद्दल जे विधान केलं होतं, त्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी मी केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी राफेल घोटाळा प्रकरणावर केलेलं वक्तव्य, चौकीदार चोर है या विधानावर माफी मागितली पण ओबीसींबद्दल केलेल्या अवमानजनक वक्तव्यावरुन राहुल गांधींनी माफी मागितली नाही. त्यामुळेच काँग्रेस अन् गांधी परिवार हा ओबीसीद्रोही असल्याची टीका देशमुख यांनी केलीय.
Letsupp Special : पक्ष बदलले पण वैर नाही! केदार विरुद्ध देशमुख संघर्षाची धार तीव्र होणार?
तसेच काँग्रेस आता म्हतारा पक्ष झाला आहे. येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेस काहीही कामगिरी करू शकत नाही. पूर्वी माझा काँग्रेसकडे कल असला तरी यापुढे मी भाजपसोबतच राहणार, असल्याची ग्वाही आशिष देशमुखांनी यावेळी बोलताना दिली आहे.
सुट्टीदिवशी कष्ट केलं, पुस्तक घेतली अन् लक्ष्मी शाळेत पहिली आली… एका संघर्षाची प्रेरणादायी कहाणी
काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत आशिष देशमुखांनी टीका केलीय. 2019 च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर नव्हे तर तलवार खुपसली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये विदर्भात त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, मला विदर्भाच्या गल्ली-गल्लीत फिरवा, माझी काहीच हरकत नाही. आगामी निवडणुकीत मी विदर्भात भाजपचे 20-25 आमदार तरी निवडून आणणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.