काँग्रेस-राष्ट्रवादीला लवकरच मोठी गळती…धमाके पाहायला तयार रहा : भाजपच्या खासदाराने दिला इशारा

काँग्रेस-राष्ट्रवादीला लवकरच मोठी गळती…धमाके पाहायला तयार रहा : भाजपच्या खासदाराने दिला इशारा

Dhananjay Mahadik : आगामी काळात कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. त्यावेळी तुम्हाला मोठा धमाका पाहायला मिळेल, असा दावा भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला आहे. खासदार महाडिक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलेल्या या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Kolhapur BJP MP Dhanajay mahadik said Congress NCP leader will join BJP )

शरद पवार ज्येष्ठ नाही तर वयोवृद्ध नेते, सदावर्तेंनी पुन्हा डिवचले!

यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत, सबंध राज्यामध्ये हा उपक्रम सुरु आहे, केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच नाही तर केंद्रीय नेतृत्व, केंद्रीय मंत्री सुद्धा प्रत्येक लोकसभा मतदार संघात येऊन जाहीर सभा घेऊन, लोकांचे प्रवेश घेऊन, आपल्या पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हा कार्यक्रम पुढील एक वर्षभर चालू राहणार असल्याचेही यावेळी खासदार महाडिक यांनी सांगितले.

यावेळी धनंजय महाडिक म्हणाले की, भारतीय जनता पक्षानं देशामध्ये 543 लोकसभा मतदार संघाच्या जागांवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. महाराष्ट्रातील 48 च्या 48 लोकसभा मतदार संघामध्ये प्रमुख लोकांची नेमणूक केली आहे. त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावर आल्या आहेत, त्याची तयारी आत्तापासूनच सुरु करण्यात आली आहे.

CM सुप्रियाताई अन् DCM आदित्य; ठाकरेंचा मास्टर प्लॅन बावनकुळेंनी केला उघड

आज राज्यामध्ये जी परिस्थिती आहे, ते आपण पाहू शकता की,भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचं सरकार सध्या राज्यामध्ये कार्यरत आहे. आणि गतिमान काम सरकारकडून सुरु आहे, असंही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

आजच्या परिस्थितीमध्ये बारा ते तेरा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत, त्यामुळे राज्यामध्ये निवडणुकीच्या जागावाटपाचे काम आज निश्चित होणार नाही, ते निवडणुका लागल्यानंतरच होईल असंही यावेळी खासदार महाडिक यांनी सांगितलं.

त्याआधी राज्यातील 48 जागांवर लक्ष केंद्रीत करुन 45 जागा निवडूण आणायचं हे नियोजन सध्या भाजपमध्ये सुरु आहे, त्याच अनुषंगाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मला जबाबदारी दिलेली आहे आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये हाळवणकर यांना जबाबदारी दिलेली आहे.

ज्या पद्धतीने आपण सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताहेत, हे सबंध राज्यामध्ये हा उपक्रम सुरु आहे, केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच नाही तर केंद्रीय नेतृत्व, केंद्रीय मंत्री सुद्धा प्रत्येक लोकसभा मतदार संघात येऊन जाहीर सभा घेऊन, लोकांचे प्रवेश घेऊन, आपल्या पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, त्यामुळे हा कार्यक्रम पुढील एक वर्षभर चालू राहणार असल्याचेही यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

आगामी काळात कॉंग्रेसचे अनेक चांगले मोठे नेते, राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील आणि त्यावेळी तुम्हाला मोठा धमाका पाहायला मिळेल असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला आहे. खासदार महाडिकांच्या या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील कोणते नेते भाजपात जाणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube