CM सुप्रियाताई अन् DCM आदित्य; ठाकरेंचा मास्टर प्लॅन बावनकुळेंनी केला उघड

CM सुप्रियाताई अन् DCM आदित्य;  ठाकरेंचा मास्टर प्लॅन बावनकुळेंनी केला उघड

Chandrasekhar Bawankule : 2022 मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं. या सत्तांतराविषयी आजही अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. काल ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी अमित शाह यांनी सत्तांतराच्या एक महिना आधीच एकनाथ शिंदेंना मुख्यंत्री करायचं ठरवलं होतं, असा दावा केला. तर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule)यांनी २०२४ मध्ये आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेचे आमदार पाडले जाणार होते, असा अलिखित करार राष्ट्रवादीसोबत झाला होता, असं मोठं विधान केलं. (Shiv Sena MLAs were to be dropped to make Aditya Thackeray Deputy Chief Minister, claim Bawankules)

आज पुण्यात टीफीन मिटींगनंतर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बावनकुळे म्हणाले, मी मागच्या वीस वर्षापासून विधासभेत आहे. युतीचा आमदार मी होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना शिवसेनेच अनेक आमदार मला भेटले. ते सांगायचे की, अजित पवार रोज मंत्रालयात येतात. रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत ते काम करतात. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही. त्यामुळं आमची कामे होत नाहीत. फाईली पुढं सरकत नाहीत. तुमचे अनेक आमदार नाराज आहेत, असं मी अनेकदा उद्धव ठाकरेंना मीडियाच्या माध्यतातून सांगितलं. पण, त्यांना २०२४ पर्यंत मुख्यमंत्री राहायचं होतं, त्यामुळं त्यांनी आमदारांच्या कुरबुरीकडे लक्ष न देता राष्ट्रवादी सोबत काम करत राहिले, असं बावनकुळे म्हणाले.

अमित शाहंपर्यंत गेलेला वाद… पडदा पडताच श्रीकांत शिंदेंनी ठरवला लोकल लेव्हलचा 

ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंच्या प्रेमात होते. त्यांचा राष्ट्रवादीसोबत अलिखित करारनामा झाला होता. ते आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीसोबत कुठलीही तडजोड करायला तयार होते. २०२४ मध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री असं शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलं होतं. त्यासाठी राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे आमदार पाडण्याचा ठाकरेंनी निर्णय घेतला होता. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पालकमंत्री होते, तिथले आमदार पाडण्याचा प्लॅन होता. रायगडच्या पालकमंत्र्यांनी तीन आमदार पाडण्याचा प्लॅन केला होता. पुढच्या काळात आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्यासाठी आम्हाला जाणून-बुजून पाडलं जाणार असं आमदारांना कळलं. आपण २०१९ मध्ये मोदींचा फोटो वापरून निवडून आलो, आता जर आपण भाजपसोबत गेलो नाही, तर आपलं राजकीय अस्तित्व संपेल म्हणून आमदारांनी भाजपसोबत येण्याला पंसती दिली, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube