Download App

‘सोमय्यांपासून काहीच लपवायचे नव्हते’; आंदोलनानंतर मंत्री विखेंनी सांगितलं काय घडलं ?

Radhakrishna Vikhe on Kirit Somaiyas Protest : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावून त्यांना हैराण करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी काल आपल्याच सरकारविरोधात मंत्रालयात आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा झाली.

रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात उद्धव ठाकरे यांचा बंगला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यावरूनच त्यांनी मंत्रालयातील महसूल खात्याविरोधात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनावर मंत्री विखे यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली नव्हती. आज मात्र त्यांनी यावर सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

संजय राऊत वि. नारायण राणे संघर्ष पेटला, राऊतांकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल

विखे म्हणाले, ‘त्यांचा (किरीट सोमय्या) तो गैरसमज होता त्यांच्यापासून कोणतेही माहिती लपवायची नव्हती. मात्र संबंधित माहिती ही मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवलेली होती. याबाबतची संपूर्ण माहिती जी आमच्या विभागाकडे आहे ती देण्यास आम्ही तयार आहोत, अशी मी सोमय्या यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांचे समाधान झाले आहे, असे विखे म्हणाले. या प्रकरणी संपूर्ण माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून मागवले असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.’

दरम्यान,  मंत्री विखे आणि सोमय्या यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या आंदोलनावर पडदा पडला आहे. मात्र, या आंदोलनामुळे वेगळाच संदेश गेला आहे. सोमय्या यांनी या मुद्द्यावर आधीही ठाकरे यांची चांगलीच कोंडी केली होती. पत्रकार परिषदा घेत उद्धव ठाकरे यांनी या बंगल्यांचे काय केले याचे उत्तर द्या, असे आव्हान त्यांनी दिले होते. मात्र, ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नव्हती.

मालाड स्टुडिओंची तक्रार सोमय्यांचीच 

मालाड परिसरातील अनधिकृत स्टुडिओंबाबतही त्यांनीच तक्रार केली होती. हे बांधकाम करण्यात काँग्रेस नेते असलम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी मदत केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर समुद्र किनारी असलेले हे बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते.

 

Tags

follow us