Jitendra Awhad on Bageshwar Dham : कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल केलेले विधान ताजे असतानाच बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री महाराज (Dhirendra Shastri) यांनी साईबाबांबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून या वादाला सुरुवातही झाली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत राज्य सरकारला घेरले आहे. कोणीही या काहीही बोला आमचे सरकार काहीच करणार नाही, जाहीर आमंत्रण.. अशा खोचक शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले बागेश्वर बाबा ?
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे या दिवसांत बागेश्वर धामची कथा सुरू आहे. कथेदरम्यान विद्वानांशी चर्चा करताना धीरेंद्र शास्त्री यांनी साईबांबाबद्दव वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात, पण देव होऊ शकत नाहीत.’ ते म्हणाले की, ‘कोळ्याची कातडी धारण करून कोणीही सिंह बनू शकत नाही.’ शंकराचार्यांचे उदाहरण देताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, ‘शंकराचार्यांनी साईबाबांना कधीच देवतेचा दर्जा दिला नव्हता. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे प्रत्येक सनातनीने त्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.’
कालिचरण महात्मा गांधींना काय वटेल ते बोलतो …
बागेश्वर साईबाबांचा अपमान करतो काय वाट्टेल ते बोलतो
महाराष्ट्रातली प्रजा सोशिक आहे त्यांना राग येत नाही
सरकार नपुंसक
..
कोणी ही या काही ही बोला कुणालाही बोला सरकार काही करणार नाही
जाहीर आमंत्रण pic.twitter.com/RV0HLLXZoE— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2023
धीरेंद्र शास्त्री अन् त्याआधी कालीचरण महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेत आव्हाड यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘कालिचरण महात्मा गांधींना काय वाटेल ते बोलतो.. बागेश्वर साईबाबांचा अपमान करतो काय वाट्टेल ते बोलतो. महाराष्ट्रातील जनता सोशिक आहे त्यांना राग येत नाही.. सरकार नपुंसक, कोणीही या काहीही बोला कुणालाही बोला सरकार काही करणार नाही, जाहीर आमंत्रण..’ असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.