Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar Riots) येथील किराडपुरा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दगडफेक करत दोन गट एकमेकांना भिडले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असली तरी राजकारणाला मात्र उकळी फुटली आहे. या दंगलीवरून आज दिवसभरात आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे. हा राजकीय धुरळा काही शांत होताना दिसत नाही. आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची भर पडली आहे.
त्यांनी या घटनेवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना लक्ष्य केले आहे. जलील यांनी केलेल्या भाषणाचा परिणाम युवकांवर झाला. त्यामुळे दंगल भडकली. दंगलीत अर्ध्या तासात पेट्रोल बॉम्ब कुठून आले ? असा सवाल करत आमचे शहर आतंकवादी लोकांच्या हिटलिस्टवर आहे.
आम्हाला शांतता भंग करायची नाही. मात्र ज्यांनी हे घडवून आणले आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिरसाट यांनी केली. यासंदर्भात आपण पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं ‘हे’ आवाहन
संजय राऊत यांना काय माहित आहे 1985 ते 1989 पर्यंत आम्ही संभाजीनगरमधील 22 दंगली हाताळल्या आहेत. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः लक्ष देत होते. संजय राऊत यांना मात्र हा इतिहास माहित नाही.
Rahul Gandhi यांच्या बंगल्यात रूम्स किती ? ते किती वीज-पाणी बिल भरतात जाणून घ्या…
संभाजीनगरमधील ही दंगल घडवून आणलेली आहे. शहरातील शांतता बिघडवण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. विरोधकांकडून या प्रकरणावर राजकारण केले जात असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला.
दरम्यान, या दंगलीच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांत आज सकाळपासूनच जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोन्ही गटांतील नेते त्वेषाने एकमेकांवर आरोप करत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही सरकारला घेरले आहे.
राऊत म्हणाले, की राज्यात दंगली घडाव्यात अस्थिरता रहावी असे काम सरकार करत आहे. सरकारचा तोच हेतू आहे. राज्यात असेच वातावरण रहावे अशी सरकारची इच्छा असून त्यासाठी मिंधे गटाच्या टोळ्या काम करत आहेत असा आरोप राऊत यांनी केला.