छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं ‘हे’ आवाहन

छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : आज रामनवमीचा (Ram Navami) उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. दोन वर्ष कोरोना असल्यानं उत्सव साजरे करण्यावर मर्यादा होत्या. मात्र, यंदा रामनवमीचा उत्साह जोरात दिसत आहे. अशातच काल छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) दोन गटात राडा झाल्यानं या उत्सवाला गालबोट लागलं. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईकराचं कुलदैवत असलेल्या मुंबादेवीचं (Mumbadevi) दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीबाबत भाष्य केलं. संभाजीनगरमध्ये सगळं नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं.

छत्रपती संभाजीनगरचं नामांतर झाल्यानंतर काल महिन्याभरातच शहरातील किराडपुऱ्यात रामनवमीच्या तयारीसाठी जमलेल्या युवकांचा दुसऱ्या एका गटाशी वाद झाला. सुरुवातीला बाचाबाची होऊन वाद मोठा वाद झाला. त्यामुळं काही वेळातच दंगल पेटली. या दंगलीत पोलिसांवरही हल्ला झाला होता. दंगलीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दरम्यान, या दंगलीवर अनेक प्रतिक्रिया येत असून संजय राऊत यांनी या दंगलीला राज्य सरकारचं जबाबदार असल्याची टीका केली होती. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत बोलतांना सांगितलं की, पोलीस आयुक्त यांच्याशी मी बोललो आहे. आता संभाजीनंगरमध्ये सगळं काही नियंत्रणात आहेत. पोलीस आपलं काम करत आहेत.

B S Yediyurappa यांची कर्नाटक विधानसभाबाबत मोठी घोषणा! 

ते म्हणाले, मी सगळी माहिती घेतली आहे. थोडासा वाविवाद झाला होता. मात्र, आता चिंतेच कारण नाही. आपण शांतता राखली पाहिजे. रमजान आणि रामनवमीचा हा महिना आहे. सर्वांनी शांततेत या उत्सवांना सहकार्य केलं पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिल याची काळजी घेतली पाहिजे, असं शिंदे म्हणाले.

यावेळी शिंदे यांनी शिंदे मुंबादेवी देवस्थानच्या विकासकामासंदर्भातही भाष्य केलं. ते म्हणाले, मुंबादेवी हे मुंबईकरांचं कुलदैवत आहे. याचा एकंदरीत विकास झाला पाहिजे. त्याचा विकास करायचा असेल तर केवळ मुंबई महापालिकाच नाही, तर डेव्हलपमेंट अॅथॉरीटी तयार करावी लागेल. ते आपण करू. विधानसभेचे अध्यक्ष आणि स्थानिक राहुल नार्वेकर, आमदार मंगल लोढा, दीपक केसरकर यांच्या संमतीने आपण या मंदिराचा विकास करू. या मंदिराच्या विकासाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube