Download App

राजकीय वनवास संपला! अखेर पंकजा मुंडे बनल्या आमदार; विधानपरिषदेत मारली बाजी

विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला निकाल हाती येत आहेत.

MLC Election Result Live Update : विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू (Maharashtra MLC Election) झाली असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांचा (Pankaja Munde) या निवडणुकीत विजय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने भाजपने त्यांना विधानपरिषदेत संधी दिली होती. या निवडणुकीत मात्र पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे. या विजयाबरोबरच पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला असून त्या आमदार झाल्या आहेत.

Pankaja Munde: Pankaja Munde : राज्यात माझ्या निवडणुकीची चर्चा जास्त पण, आशीर्वाद द्यायलाच कुणी नाही

उमेदवारांना निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मागील निवडणुकीचा अनुभव असल्याने काँग्रेस, ठाकरे गट सतर्क झाले होते. तर दुसरीकडे महायुतीनेही तगडे प्लॅनिंग केले होते. महाविकास आघाडीने एक जास्तीचा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली होती. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज राहणार होती. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याचीही भीती होती. यासाठी खबरदारी म्हणून भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले होते. मतदानाच्या दिवशी म्हणजे आज या आमदारांनी हॉटेलातून थेट सभागृह गाठले.

मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपातून साईडलाईन झाल्या होत्या. मागील राज्यसभा निवडणुकीत त्यांना संधी मिळेल असे सांगितले जात होते. मात्र तसे काही घडलेच नाही. यानंतर महायुतीने त्यांना लोकसभा निवडणुकीत संधी दिली. यासाठी महायुतीने त्यांच्या बहिण प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापले. या निवडणुकीत मविआचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. यानंतर पंकजा मुंडेंचं काय होणार असा प्रश्न विचारला जात होता.

लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका विचारात घेऊन पक्षातील जुन्या नेत्यांना नाराज करून चालणार नाही. हे भाजपाच्या लक्षात आलं होतं. मराठवाड्यात भाजपाचा दणदणीत पराभव झाला होता. त्यामुळे या भागात पंकजा मुंडे यांना बळ देणं गरजेचं होतं. त्यामुळे भाजपने विधानपरिषदेत पंकजा मुंडेंना संधी देत राजकारणात आणलं. या निवडणुकीत पंकजा मुंडे आता आमदार झाल्या आहेत. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना 26 मते मिळाली.

विधान परिषदेची उमेदवारी मिळण्यात फडणवीसांचा किती वाटा?, पंकजा मुंडेंनी दिलं जोरदार उत्तर

follow us