Download App

मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; माजी खासदार प्रिया दत्त हाती घेणार धनुष्यबाण?

Priya Dutt may Join Shivsena Shinde Group : ‘मिलिंद देवरा’, ‘अशोक चव्हाण’ आणि ‘बाबा सिद्दीकी’ ही तीन नावं म्हणजे एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज नेते. पण, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या नेत्यांनी काँग्रेसचा (Congress Party) हात सोडला. मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला. अशोक चव्हाण भाजपवासी झाले तर बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांना साथ दिली. आता या यादीत आणखी एका नेत्याची भर पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त लवकरच (Priya Dutt) शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जर सगळी राजकीय समीकरणं जुळून आली आणि प्रिया दत्त यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला काँग्रेससाठी हा आणखी एक मोठा धक्का ठरेल.

मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा : देवरांपाठोपाठ बाबा सिद्दीकीही सोडणार ‘हात’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात पक्षविस्तारावर भर दिला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यशही मिळत आहे. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच मिलिंद देवरा यांच्या रुपाने मुंबईतील मोठा नेता एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. देवरा यांच्यानंतर अशोक चव्हाण आणि बाबा सिद्दीकी यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. आता प्रिया दत्त सुद्धा काँग्रेसचा हात सोडतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रिया दत्त या शिंदेंच्या शिवसेनेत आल्या तरी त्यांना लोकसभेचं तिकीट मिळेल याची शक्यता कमीच आहे. कारण, शिंदेंचे जे खासदार आहेत त्यांनाच यंदा तिकीट मिळेल की नाही असा प्रश्न आहे. प्रिया दत्त यांना जरी खासदारकीची उमेदवारी मिळाली नाही तरी भविष्यात राज्यसभा किंवा विधानपरिषदेची आमदारकी हे दोन पर्याय शिंदेंकडून त्यांना दिले जाऊ शकतात.

मिलिंद देवरा यांनी भगवं उपरण घातलं! पण दक्षिण मुंबई एवढी सोपी नाही..

प्रिया दत्त यांनी 2009 मध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पार्टीच्या पूनम महाजन यांनी त्यांना पराभूत केलं होतं. आता प्रिया दत्त राजकारणात फारशा सक्रिय नाहीत. एका एनजीओच्या माध्यमातून त्या समाजसेवा करत आहेत.

 

follow us