Download App

मंत्री गडकरींना धमकीचे फोन करणारा जयेश पुजारी नागपूर पोलिसांच्या ताब्यात

Nitin Gadkari News : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना फोनवरून धमकी देणारा गॅंगस्टर जयेश पुजारी याला नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी नागपूर येथे आणले आहे. जयेश पुजारीने 14 जानेवारी रोजी आणि गेल्या आठवड्यात नितीन गडकरींच्या ऑफिसमध्ये खंडणीसाठी फोन केला होता.

जानेवारीमध्ये केलेल्या फोन मध्ये शंभर कोटी रुपयांची खंडणी जयेश पुजारीने मागितली होते. तसेच मागील आठवड्यात केलेल्या फोनमध्ये दहा कोटी रुपये गुगल पे करण्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी दखल घेत तपास सुरू केला होता. त्यानंतर कर्नाटकातल्या बेळगाव मधल्या हिंडलगा सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या जयेश पुजारीने फोन केल्याचे पुढे आले होते. त्याने सेंट्रल जेलमधून फोन केल्याचे निष्पन्न झाले.

खोक्यांची टीका अंगलट; दिल्ली उच्च न्यायालयाचे ठाकरे पित्रापुत्रासह राऊतांना समन्स

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुजारी याला विशेष विमानाने नागपुरला आणले आहे. आवश्यक वैद्यकिय कार्यवाही पूर्ण करून त्याला अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

या प्रकरणात त्याची चौकशी महत्वाची राहणार आहे. त्यातून पुढील तपासाला अधिक गती मिळणार आहे. धमकी देणारा एकटा आहे की त्याच्याबरोबर आणखी कुणी आहे याची माहिती चौकशी केल्यानंतरच समोर येईल.

Atique Ahmed : उमेश पाल अपहरणाचा निकाल आला; अतिक अहमदसह तिघांना जन्मठेप

काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांच्या पथकाने बंगळुरू येथील त्याच्या कोठडीची झडती घेतली  होती. त्यावेळी दोन मोबाईल, व दोन सिम कार्ड मिळाले. त्यातील एक मोबाइल आणि सिमकार्ड तेच आहे जे आताच्या प्रकरणात वापरण्यात आले आहे. मोबाइल फोन आणि सिमकार्डचा वापर तो आणखी कोणत्या कारणांसाठी वापर करत होता हे सगळे पोलीस तपासातून समोर येईल, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.

Tags

follow us