Sharad Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. राज्याच्या राजकारणातील अनपेक्षित घडामोडींमुळे मात्र सगळीच गणिते बदलली आहेत. अशाही परिस्थितीत राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणाला किती जागा मिळणार याचेही सर्व्हे येऊ लागले आहेत.
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं भाकित केलं आहे. शरद पवार यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. यासाठी कोल्हापुरला रवाना होण्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकेल असे सांगितले.
Uddhav Thackeray : ‘मिशन सन’ ठीक पण, आधी कांद्याचं भरकटलेलं ‘यान’ लँड करा! ठाकरे गटाचा खोचक टोला
इंडिया टुडे सी व्होटरच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेच्या सर्वाधिक जाग मिळणार आहे. केंद्रात मात्र मोदी सरकारच येईल असा सर्वे आला आहे, असे त्यांना विचारण्यात आले. त्यावर मला याबाबत काही माहिती नाही. किती लोकांना त्यांनी विचारून हा सर्वे केला हे देखील मला माहिती नाही. पण, आम्ही जी माहिती विविध संस्थांकडून घेत आहोत त्यातून असं दिसत आहे की महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
कांद्याच्या उत्पादन खर्चाला साजेशी किंमत मिळाली पाहिजे. परंतु तशी किंमत आज मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांदा हे जिरायत शेतकऱ्यांचे पीक आहे त्यामुळे त्यांच्याकडे अधिक सहानुभूतीने पाहिले पाहिजे. परंतु, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज राज्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. साखरेच्या निर्यातीवर बंधने आणावीत अशीही चर्चा केंद्र सरकारच्या त्या खात्याच्या मंत्रालयात सुरू आहे. साखरेवर सुद्धा निर्यातीवर बंधने येतील आणि तसं जर घडलं तर बाजारात साखरेचे भाव पडतील, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
‘अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट नाही’; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ!