Uddhav Thackeray : ‘मिशन सन’ ठीक पण, आधी कांद्याचं भरकटलेलं ‘यान’ लँड करा! ठाकरे गटाचा खोचक टोला
Uddhav Thackeray : भारताने बुधवारी अवकाशात मोठा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या चांद्रयान (Chandrayaan 3) उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश बनला. या ऐतिहासिक कामगिरीचे जगभरातून कौतूक होत आहे. मोदी सरकारचेही काही जण अभिनंदन करत आहेत. हाच धागा पकडून ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. सामान्य जनता महागाई, बेरोजगारीचे चटके सहन करत आहे. आला दिवस ढकलत आहे. राज्यकर्ते शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वतःच्या भाषणाची टिमकी वाजविण्यात आणि नंतर चांद्रयानाच्या यशाची पुंगी वाजविण्यात मग्न आहेत.
मिशन मूननंतर मिशन सन, मिशन शुक्र अशा नवनवीन स्वप्नांचा भूलभूलैया जनतेला गुंतवित आहे. मिशन सन वगैरे ठीक आहे पण, सध्या भरकटलेले कांद्याचे यान देखील नीट लँड होणे तेवढेच महत्वाचे आहे. तुम्ही सूर्याच्या दिशेने यान जरूर सोडा पण, आधी कांद्याचे यान लँड करा! नाहीतर 2024 मध्ये तुमचे सत्तेचे यान कसे भरकटेल हे तुम्हालाही कळणार नाही, अशी खोचक टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : मलाही लव्ह लेटर आलंय, आमदार रोहित पवारांनी सांगूनच टाकलं..
शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावेच लागते
हतबल कोण असेल तर तो सामान्य शेतकरी निसर्ग जगू देत नाही आणि सरकार मरू देत नाही अशा विचित्र चरकात शेतकरी सापडला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था तर एवढी दारूण आहे की त्याचा एकही हंगाम आंदोलन केल्याशिवाय जात नाही. कधी दरासाठी तर कधी सरकारी निर्णयाविरोधात, कधी आयातबंदीसाठी तर कधी निर्यातबंदीसाठी त्याला रस्त्यावर उतरावेच लागते.
दर पडल्याने कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. आताही मोदी सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करून कांदा उत्पादकांचा वांधाच करून ठेवला आहे. त्यासाठी कारण दिले आहे, ते कांद्याचे दर वाढतील आणि सामान्य माणसाची होरपळ आणखी वाढेल हे. शेतकरी आणि सामान्य जनता यांपैकी कोणालाच झळ पोहोचणार नाही याची खबरदारी सरकारला घ्यावी लागते हे खरेच, परंतु प्रत्येक वेळी या धोरणाचा फटका बळीराजालाच सहन करावा लागतो त्याचे काय असा जळजळीत सवाल या लेखातून विचारण्यात आला आहे.
‘तु तुझी अगरबत्ती कुठे लावतो गद्दार दादुड्या?, अयोध्या पौळ यांची शिंदे गटाच्या आमदारावर बरसल्या
पंतप्रधान मोदी अजब रसायन
पंतप्रधान मोदी म्हणजे अजब रसायन आहे. चांद्रयानाने ऐतिहासिक यश मिळवले तेव्हा मोदी हे दक्षिण आफ्रिकेत होते. यावर मोदी यांनी परदेशातून संदेश दिला की भारताने ऐतिहासिक यश मिळवले आहे. मात्र तेवढ्याने समाधान होणार नाही. आता सूर्य शुक्रासह विविध ग्रह भारताचे लक्ष्य असेल. पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. पण, देशातील 140 कोटी जनतेचे लक्ष्य महागाई, बेरोजगारी आहे. अनेक लक्ष्य कांद्याच्या वांध्यावर आहे. चंद्रावर सूर्यावर यान उतरल्याने या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळणार असेल तर आनंदी आनंदच आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे.