Download App

आव्हाडही भाजपसोबत जाण्यासाठी अजितदादांना ‘हो’ म्हणाले होते, पण… :

Jitendra Awhad : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानंतर मंत्रिमंडळाची बैठकही झाली आहे. अजित पवार गटाच्या कोणाला काय खाते मिळणार याची उत्सुकता आहे. अजित पवार यांनी घडवलेल्या या भूकंपावर अजूनही प्रतिक्रिया येतच आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांसमोर त्यांची आदरयुक्त भीती, दहशत त्यांचा दरारा आणि लोकांना त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम अन् आदर. यामुळे लोकं त्यांना तोंडावर नाही म्हणतच नाहीत. मी त्यांना हो म्हणालो होतो. पण, मागे जाऊन ठरवलं की मी जाणार नाही. त्यांची दहशतच तेवढी आहे त्यांना कोण नाही म्हणणार तोंडावर असे आव्हाड म्हणाले.

बहुमत असताना अजितदादांना का घेतले? फडणवीसांनी न्याय दिलाच पाहिजे; शिंदे गटाचे आमदार भडकले

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यावेळी त्यांनी आमदारांना सुरत मार्गे गुवाहाटीला घेऊन जात बंड पुकारलं होत. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी देखील भाजपसोबत जाण्याचा प्लॅन केला होता. त्यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना पत्र देखील लिहिले होते. मात्र त्यांनी लवकर निर्णय घेतला नाही. तोपर्यंत शिंदेंनी परत येत मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली, असा दावा प्रफुल्ल पटेलांनी केला होता.

यावरही आव्हाड यांनी भाष्य केले. पटेलांनी पवार साहेबांना पत्र दिलं होतं. त्यात म्हटलं होतं की आपण विचार करावा. त्यावर पवार साहेबांनी नाही म्हटल्यानंतर काही प्रश्नच येत नाही, असे उत्तर आव्हाड यांनी दिले.

भाजपात भाकरी फिरली; पराभवाच्या भीतीने बदलले प्रदेशाध्यक्ष

माझं कार्यालय माझ्या बापाच्या मालकीचं 

या घडामोडींनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आव्हाड यांना विचारताच ते चांगलेच संतापले. माझं कार्यालय माझ्या बापाच्या मालकीचं आहे. माझे वडील जिवंत होते ना त्यावेळी हे कार्यालय घेतलेलं आहे. राष्ट्रवादीच्या प्रेमापोटी ते राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेलं आहे. कुणाच्या बापाचं कार्यालय नाही, अशा शब्दांत त्यांनी ठणकावले.

Tags

follow us