अजित पवार गटाला ‘सुप्रीम’ फटकार; न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावू नका

NCP Crisis Supreme Court Hearing : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Elections) शरद पवार गट आणि अजित पवार गटात पक्षाचे नाव आणि चिन्हावरून न्यायालयात लढाई सुरू आहे. आज याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अजित पवार गटाला चांगलेच फटकारले. शरद पवार गटाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन अजित पवार गट करत […]

तुम्हाला अपात्र का करू नये? आमदार अपात्रते प्रकरणी अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्हाचं काय होणार? दोन आठवड्यात उत्तर द्या; अजित पवार गटाला 'सुप्रीम' आदेश

NCP Crisis Supreme Court Hearing : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Elections) शरद पवार गट आणि अजित पवार गटात पक्षाचे नाव आणि चिन्हावरून न्यायालयात लढाई सुरू आहे. आज याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अजित पवार गटाला चांगलेच फटकारले. शरद पवार गटाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन अजित पवार गट करत नाही असा आरोप शरद पवार गटाने या याचिकेत केला होता.

शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी याचिका दाखल केली होती. अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेलं घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट आहे असे जाहिरातीत लिहिणे गरजेचे आहे. मात्र, न्यायालयाच्या या आदेशाचे अजित पवार गट पालन करत नाही असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा कुणीही चुकीचा अर्थ लावू शकत नाही असे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात सांगितले.

या प्रकरणात अजित पवार गटाचे वकिल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. आदेशातील शेवटची ओळ बदलण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यानंतर सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला आतापर्यंत प्रकाशित करण्यात आलेल्या सर्व जाहिराती न्यायालयात जमा करण्याच्या सूचना दिल्या. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी घेण्यासाठी लवकरच बोर्डासमोर घेऊ असे न्यायालयाने म्हटले.

Ajit Pawar यांच्या अडचणीत वाढ; शिखर बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या रिपोर्टला ईडीचा विरोध

Exit mobile version