Download App

अदानी दुसऱ्यांदा पवारांना भेटले; अजितदादांनी कारण टाळलं पण लॉजिक सांगितलं

Ajit Pawar : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गुरुवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली.  या भेटीच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहेत. या भेटीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

गौतम अदानीही अनेकदा पवार साहेबांना भेटत असतात. त्यांची ओळख आहे. त्यांची काही अडचण असतील, प्रश्न असतील. जरी हिंडेनबर्गचा अहवाल आला असला तरी देखील त्यांची अनेक राज्यात गुंतवणूक सुरू आहे. राज्यातही त्यांचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. ते नेमके कोणत्या कारणासाठी भेटले हे मला माहिती नाही. मी काल संध्याकाळी मुंबईहून पुण्याला गेलो होतो असे पवार म्हणाले.

https://letsupp.com/politics/sanjay-raut-spoke-clearly-about-the-seat-allocation-of-mahavikas-aghadi-said-53238.html

 

शिंदे-पवार भेटीत गैर काय 

राज्याचे मुख्यमंत्री कुणीही असेल तरी भेटावं लागतं. यामध्ये खमंग चर्चा करण्याचं काहीच कारण नाही. राज्यातील अनेक जण शरद पवार यांनाही भेटत असतात. त्यांच्या प्रश्नांसाठी ते येत असतात. त्यामुळे कोण किती वाजता भेटले, कोणता मुद्दा काढला मी मागे उपमुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह महत्वाच्या कामांसाठी पंतप्रधानांना भेटलो होतो. पंतप्रधानांनी वेळ दिली होती. तेव्हा काहीही मनात आणू नका, असे अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवार यांनी माझी सदिच्छा भेट घेतली आहे. ही राजकीय भेट नव्हती. मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या संस्थेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. त्यांनी मला कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. कोणतेही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

https://letsupp.com/politics/sanjay-raut-spoke-clearly-about-the-seat-allocation-of-mahavikas-aghadi-said-53238.html

यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

अदानी दुसऱ्यांदा पवारांना भेटले 

याआधी या अगोदर २० एप्रिल रोजी गौतम अदानी व शरद पवार यांच भेट झाली होती. त्यावेळी सिल्व्हर ओकवर बंद दाराआड २ तास चर्चा झाल्याची माहिती होती. त्यावेळी भेटीमध्ये काय चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती समोली आली नाही. तसेच गुरुवारी झालेल्या भेटीत काय चर्चा झाली ते देखील समोर आलेले नाही.

Tags

follow us