Download App

2024 मध्ये राष्ट्रवादी असेल सर्वात मोठा पक्ष.. फडणवीसांच्या टीकेवर जयंत पाटलांचं भाकीत

Jayant Patil Replies to Devendra Fadnavis : कर्नाटक निवडणुकीतील प्रचारा दरम्यान (Karnataka Elections) देंवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. येथील प्रचार सभेत फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. येथेही त्यांचा उमेदवार आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्यांचं काय करायचं ते बघतो.

फडणवीस यांच्या टीकेवर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार प्रहार केला आहे. ते म्हणाले, ज्यांना स्वतःचं स्थान टिकवता आलं नाही. त्यांनी आमची मापं काढावीत का ? जनतेनं आमचं सरकार स्वीकारलं असताना, आमच्यातील लोक फोडण्याचं पाप केलं. नंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, असं वाटलं होतं. पण, दिल्लीतील लोकांनी दुसऱ्यांनाच मुख्यमंत्री केलं. गडचिरोली, जळगाव आणि भंडाऱ्यापर्यंत आमचा पक्ष पसरला आहे. आमचा पक्ष साडेतीन जिल्ह्यांचा नाही. शरद पवारांच्या झंझावातात राष्ट्रवादी काँग्रेस 2024 साली सर्वात मोठा पक्ष होणार आहे. कार्यकर्त्यांना आयुष्यभर सांभाळण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे.

मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदार होणार अपात्र? असीम सरोदेंनी व्यक्त केल्या चार शक्यता

कर्नाटकातील निवडणूक प्रचार काल थंडावला. उद्या 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 13 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. काँग्रेस आणि भाजपात खरी लढत आहे. यंदा काँग्रेसचे पारडे थोडे जड दिसत आहे. याचा अंदाज भाजपालाही आहे. त्यामुळे सत्ता राखण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती.

पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्री, आमदार खासदार अन्य भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री कर्नाटकात आले. त्यांनीही येथे जोरदार प्रचार केला. काँग्रेस नेतेही मागे नव्हते. तर दुसरीकडे जेडीएसचे वयोवृद्ध नेते माजी पंतप्रधान देवेगौडा हे सुद्धा निवडणूक प्रचारात सक्रिय होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य भाजपा नेते प्रचारासाठी कर्नाटकात गेले होते.

आम्ही पक्षात काय करतो राऊतांना माहिती नाही…पवारांचे राऊतांना प्रत्युत्तर

Tags

follow us