Rohit Pawar : ‘सन 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हा (Rohit Pawar) पवार साहेबच चेहरा अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलो होतो. त्यावेळीही चिन्ह नवीनच होतं. पण पवार साहेबांकडे बघून लोकांनी ते स्वीकारलं. आता तर सोशल मीडिया आहे. त्यामुळ आताचं नवीन चिन्ह लोकांपर्यंत जायला वेळ लागणार नाही. लोकांच्या मनातही उत्सुकता होती. जे घर पवार साहेबांनी बांधलं राष्ट्रवादी त्यातूनच पवार साहेबांना बाहेर काढलं गेलं, हे लोकांनी पाहिलं आहे. लोकांना हे आजिबात पटलेलं नाही. आता चिन्ह जे मिळालं आहे ते महत्वाचं आहे. कोणत्याही लढाईच्या आधी तुतारी वाजवली जाते. आताचा लढा हा अहंकाराविरोधात आहे. स्वार्थाविरोधात आहे आणि सामान्य लोकं या सत्ताधाऱ्यांविरोधात लढणार आहेत’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं.
Rohit Pawar : ‘शेतकऱ्यांचा नाही, बड्या व्यापाऱ्यांचाच फायदा’; रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
रोहित पवार पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाले आहे. पक्षचिन्ह कुठलंही असलं तर काहीही परिणाम होणार नाही. याआधी 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळीही पक्षचिन्ह नवीनच होतं. पण पवार साहेब चेहरा होते. लोकांनी पवार साहेबांकडे पाहून स्वीकारलं. आताही सोशल मीडिया आहे. व्हॉट्सअप आहे त्यामुळे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगान ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला दिलं. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या आदेशाची माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकात हे नवे पक्षचिन्ह घेऊन शरद पवारांचा पक्ष लोकांत जाणार आहे.
संघर्ष टोकाला !’दादागिरी’चा उद्योग करणाऱ्या ‘मलिदा’ गँगेनेही लक्षात ठेवावे; रोहित पवारांचा थेट इशारा
याआधी राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला मिळालं. त्यामुळे शरद पवार यांनी पक्षांसाठी वेगळं नाव आणि चिन्ह आयोगाला सुचवलं होतं. तीन चिन्ह सुचवण्यात आली होती. पक्षाचं नाव आगामी राज्यसभा निवडणुकीपुरतं होतं त्यामुळे पक्षाला चिन्ह देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे शरद पवार गटाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले होते.