Sunil Tatkare replies Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटांच्या नेत्यांत जोरदार आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अजित पवार गटावर तुटून पडले आहेत. त्यांच्याकडून रोज नवीन खुलासे केले जात आहेत. त्यांच्या या आरोपांना अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. आताही खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर महाविकास आघाडीचं सरकार टिकलं नसतं, असे वक्तव्य तटकरे यांनी केले.
याआधी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. 2019 मध्ये बंड केल्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती. एकदा माणूस गद्दार असेल तर त्याच्या मनात कायम असतं. ज्या ज्या वेळेस संधी मिळाली तेव्हा अजित पवार यांनी शरद पवारांच्या सहकाऱ्यांचा अपमान केला.
Jitendra Awhad : “पुतण्या गद्दार निघाला!” आव्हाडांची जहरी टीका; मिटकरींचाही पलटवार
आव्हाडांच्या या टिकेवर तटकरे यांनी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. अजित पवार नसते तर राज्यातील पक्षाची सगळी कार्यालयं उभी राहिली नसती. जागा घेण्यापासून ते बांधकामापर्यंत सगळी कामं अजित पवार यांनीच पाहिली. 2019 मध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री देऊन उपकार केले नाहीत. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर आठ दिवसही महाविकास आघाडीचं सरकार टिकलं नसतं, असे तटकरे म्हणाले.
आज वेळ नवीन असली तरी भावना मात्र त्याच आहेत, पण त्या पोचत नसल्याने आणि समजत नसल्याने संघर्ष मात्र अटळ आहे, असे रोहित पवारांनी आपल्या एक्स अकाउंटवरून म्हटले आहे. तसेच शेवटी प्रश्न महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि सामान्य माणसाच्या अस्तित्वाचा आहे. साहेब, लडेंगे..जितेंगे असेही रोहित पवारांनी म्हणत अजित पवार यांना आव्हान दिले होते.
जुना फोटो शेअर करत रोहित पवारांचे अजितदादांना आता थेट आव्हान