Jitendra Awhad : “पुतण्या गद्दार निघाला!” आव्हाडांची जहरी टीका; मिटकरींचाही पलटवार

Jitendra Awhad : “पुतण्या गद्दार निघाला!” आव्हाडांची जहरी टीका; मिटकरींचाही पलटवार

Jitendra Awhad vs Amol Mitkari : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाचे नेते अजित पवारांवर तुटून पडले आहेत. अजितदादांवर घणाघाती टीका केली जात आहे. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आघाडीवर असून जोरदार प्रहार करत आहेत. आताही त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लक्ष्य करत टोचणारी टीका केली. ही टीका अजित पवार गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली असून आमदार आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात ट्विट वॉर सुरू झाले आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आव्हाड यांनी ट्विट करून, पुतण्या गद्दार निघाला असं म्हणत अजित पवारांना उद्देशून कविता केली. त्यावर मिटकरी यांनीही शेरोशायरीतून पलटवार केला. “कारण, पुतण्या गद्दार निघाला. वेळ अशी येईल की, वेळ येईल विचारण्याची. काका का असे करता? माफ करा चुकी झाली आणि ह्या वेळेस 2019 सारखी माफी नाही. गद्दारांना माफी नाही!”

आव्हाडांच्या या खोचक कवितेवर मिटकरी यांनीही जोरदार पलटवार केला आहे. “बेशक उंगली उठाना मेरे किरदार पर| शर्थ ये है, तेरी उंगली बेदाग होनी चाहिये||” #तथाकथित पुरोगामी, असे प्रत्युत्तर आमदार मिटकरी यांनी शायरीतून दिले आहे. त्यांच्या या प्रत्युत्तरानंतर आता जितेंद्र आव्हाड काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार  आहे.

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ?

निवडणुकीत महाविकास आघाडीचे अस्तित्व टिकावे यासाठी काँग्रेस हायकमांकडून शरद पवार यांना मोठा प्रस्ताव देण्यात आला आहे. शरद पवारांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करून एका चिन्हावर निवडणूक लढावी असा हा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असा दावाही काल शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी केला होता. मात्र, या दाव्यात काहीच तथ्य नाही. या बातम्या निराधार असल्याचा खुलासा खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला होता.

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होणार? बैठकीत गेलेल्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

आमदार अपात्रतेचा आज निकाल 

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष (Election Commission) आणि चिन्ह अजित पवार गटाला सुपूर्द केल्यानंतर पक्षातील आमदारांचे प्रकरण चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी (NCP MLA Disqualification Case) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर (Rahul Narwekar) सुरू आहे. या प्रकरणात नार्वेकर निकाल देणार आहेत. त्यामुळे दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज